

मालाड : येथील तानाजीनगर येथे नारायण शुक्ला चाळीत राहणारा विकास पासवान (वय 20) याने त्याच परिसरातील कुत्र्याच्या अडीच वर्षाच्या पिल्लाला शौचालयात नेऊन त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. परंतु कुरार पोलिसांनी त्याच्यावर कोणताही गुन्हा न नोंदवता त्याला सोडून दिल्याने प्राणीप्रेमी व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सदर घटना दि.18 रोजी घडली. दुपारी चारच्या सुमारास नारायण शुक्ला चाळीत भाड्याने राहणाऱ्या विकास पासवान याने नशा केली होती. नशेच्या अवस्थेत त्याने एका अडीच महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन शौचालयाच्या एका बाथरूममध्ये नेले. यावेळी बाथरूममधून कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने तेथे नागरिक जमा झाले. त्याला शौचालयातून बाहेर काढले.
असता कुत्र्याचे पिल्लू जोरजोरात किंचाळू लागले. यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच पिल्लाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. यावेळी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केल्याने पिल्लाच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. स्थानिक नागरिक कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन कुरार पोलीस चौकीत गेले असता पोलिसांनी गुन्हा न नोंदवता दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले.