रूग्णवाहिका खरेदीत मोठा ढपला; एसआटीमार्फत चौकशी करा

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी
Vijay Wadettiwar News
रूग्णवाहिका खरेदीतील घोटाळ्यावरून विजय वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक झाले होते. Pudhari File Photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यात रूग्णवाहिका खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. या खरेदीत टेंडर फुगवले गेले असून तीन हजार कोटींचे काम दहा हजार कोटींवर नेले आहे. ३० टक्केच्यावर कमिशन या घोटाळ्यात घेतले गेले आहे. हा घोटाळा कोणाच्या पुत्रासाठी केला जातोय, या घोटाळ्यात किती नेत्यांचे खिसे गरम झालेत, असे सवाल करत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी आज (दि. ९) विधानसभेत केली. त्याचबरोबर महाराष्ट्र लुटा आणि गुजरातला वाटा, अशा शब्दांत त्यांनी सरकारचे वाभाडे काढले.

Vijay Wadettiwar News
गडचिरोलीची जागा हरली तर राजकारणातून संन्यास घेणार : विजय वडेट्टीवार

Summary

  • राज्यात रूग्णवाहिका खरेदीत मोठा घोटाळा

  • खरेदीत टेंडर फुगवून ३ हजार कोटींचे काम १० हजार कोटींवर

  • या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी

Vijay Wadettiwar News
पक्ष फोडणाऱ्यांना जनता जागा दाखविणार : विजय वडेट्टीवार

वडेट्टीवार म्हणाले की, रूग्णवाहिका खरेदी घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. हे सरकार रूग्णांच्या टाळूवरचे लोणी खात आहे. सनदी अधिकाऱ्यांनी या घोटाळ्याला विरोध केला, म्हणून त्यांची बदली देखील करण्यात आली आहे. निवडणूक फंडासाठी हा उद्योग सुरू आहे. आरोग्य यंत्रणेचे धिंडवडे निघत असताना हा घोटाळा केला जात आहे. महाराष्ट्र लूटून साफ करण्याचा उद्योग सुरू आहे. त्यामुळे या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news