Majhi Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवणार

मुख्यमंत्र्यांचे 'वर्षा'वर संकेत
Majhi Ladaki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना File Photo
Published on
Updated on

मुंबई : माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देत आहेत. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत आणखी वाढ करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिले.

राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी जाऊन रक्षाबंधनानिमित्त त्यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. उमेदच्या माध्यमातून राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात येणार आहेत. या संकल्पाची सुरुवात वर्षा निवासस्थानी झाली. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे दोन हप्ते रक्षाबंधनापूर्वी माझ्या बहिणींच्या खात्यात जमा व्हावेत, असा आमचा प्रयत्न होता. तो शब्द आम्ही पाळला. राज्यातील १ कोटी ४ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. अन्य महिलांच्या खात्यातही हळूहळू आधार सिडिंग आणि तांत्रिक बाबी पूर्ण होताच पैसे जमा होतील, असे शिंदे म्हणाले.

उमेद अभियानाचे काम कौतुकास्पद

उमेद अभियानामुळे राज्यात ८४ लाख महिला बचत गटांच्या चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. ही संख्याही १ कोटीवर न्यायची आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपण सगळ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठे योगदान देत आहात. तुमच्या उत्पादनांनाही चांगली बाजारपेठ मिळावी असे आमचे प्रयत्न आहेत. मोठमोठ्या मॉलमध्ये, अमेझॉन, फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवरही आपली उत्पादने विकली जावीत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. बसस्थानकावर आपल्या स्टॉल्सला जागा मिळावी, असे निर्देश दिलेच आहेत. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाबाबत केंद्रांशी संपर्क साधून आहोत.

Majhi Ladaki Bahin Yojana
बँकांनी लाडक्या बहिणींचे पैसे कट केल्यास होणार कारवाई?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news