

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई क्राइम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने माहीम परिसरातून अंमली पदार्थ पुरवठादारांना अटक केले. त्यांच्याकडून 1.23 कोटी रुपयांची चरस जप्त केले आहे. या प्रकरणी करण रमेश सिंग (वय २९) आणि अभिषेक राजेंद्र सिंग (वय २९) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून दोघेही मीरा रोडचे रहिवासी आहेत. (Mumbai Crime News )
आरोपी माहीम येथे चरसचा पुरवठा करण्यासाठी आले होते तेव्हा पोलिसांच्या गस्ती व्हॅनने त्यांना संशयास्पदरित्या फिरताना पाहिले आणि त्यांची चौकशी करण्यासाठी थांबवले. त्यांच्या बॅगची तपासणी केली असता त्यात चरस आढळून आले.
त्यापैकी एकाच्या बॅगेत 112 ग्रॅम चरस असल्याचे आढळून आले. ज्याची किंमत 11.20 लाख रुपये आहे. तर दुसऱ्याच्या बॅगेत 1.12 कोटी रुपये किंमतीचे 1 किलो आणि 120 ग्रॅम चरसचे दोन पाउच आढळून आले. त्यानंतर दोन्ही आरोपींना अधिक चौकशीसाठी गुन्हे शाखेच्या युनिट कार्यालयात आणण्यात आले.
तपासादरम्यान आढळून आले की, आरोपींनी हा चरस उत्तर प्रदेशातून आणला होते. आरोपींना या चरसची ऑर्डर इंटरनेटवरून आली होती. दरम्यान, या प्रकरणी गुन्हे शाखेचा पुढील तपास सुरू आहे.