Mahesh Kothare
मुंबई : दिग्दर्शक, अभिनेता महेश कोठारे यांनी मुंबईच्या बोरवलीमध्ये आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमामध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी केली आहे. भाजप म्हणजे आपलं घर आहे. मी मोदीजींचा भक्त आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत मुंबईवरती कमळ फुललेलं असेल," असे महेश कोठारे यांनी म्हटले आहे. बोरवलीमध्ये प्रवीण दरेकरांकडून या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोठारे यांच्या या विधाननंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. "ते नक्की मराठी आहेत ना मला शंका वाटते. ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, प्रत्येकाला मताचा अधिकार आहे, पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितले नाही. अस बोलत असाल तर तात्या विंचू मराठी माणूस होता रात्री चावेल आणि गळा दाबेल," असे राऊत यांनी म्हटले आहे.