.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबईः महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सर्वच मंत्र्यांना खात्याचे वाटप झाले आहे. खाते वाटपानंतर काही मंत्र्यांनी मंत्रालयातील आपल्या दालनाचा ताबा घेत पदभार स्विकारला आहे. मात्र, एक डझनहन अधिक मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्विकारला नसून महायुती सरकारच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी या मंत्र्यांना आता नव्या वर्षाचा मुहूर्त गाठावा लागणार आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, २१ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये ३३ कॅबिनेट व ६ राज्यमंत्र्यांचा समावेश झाला. विस्तारानंतर लगेच मंत्रालयातील दालन आणि सरकारी निवासस्थानांचे वाटपही झाले. मात्र किमान डझनभर मंत्री अजूनही मंत्रालयात रुजू झालेले नाहीत. सोमवारी अमावस्या असल्याने मंत्री पदभार स्विकारण्याची शक्यता कमी आहे. तसेच ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक मतदारसंघात जंगी कार्यक्रम आहेत. त्यामुळेही हे मंत्री आपआपल्या मतदारसंघात आहेत. नव्या वर्षात मतदारांच्या भेटीगाठी घेत, त्यांना नव वर्षांच्या शुभेच्छा देत हे मंत्री पुढील आठवड्यात मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यातच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक आठवड्याचा शासकीय दुखवटा असल्यामुळेही म्हणे त्यांनी खात्याचा ताबा घेतलेला नाही. आता नव्या वर्षातच ते आपापल्या खात्यांचा पदभार स्विकारतील.
गुलाबराव पाटील, दादा भूसे, आशिष शेलार, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, भरत गोगावले, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, प्रकाश आबिटकर, अतुल सावे, आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, माधुरी मिसाळ, आशिष जयस्वाल, मेघना बोर्डीकर, योगेश कदम, पंकज भोयर