Vidhan Parishad Result 2026 Live: गोकुळ गिते मारणार पलटी; भाजपला धक्का देत शिंदेंचे धनुष्यबाण घेणार हाती?

Vidhan Parishad Result 2026 Live
Vidhan Parishad Result 2026 Livepudhari
Published on
Updated on

महायुतीने किती जागा जिंकल्या? 

विधानपरिषद निवडणूक २०२६ मध्ये ११ जागांचे निकाल आज जाहीर झाले. त्यातील ११ पैकी १० जागांवर महायुतीने दणदणीत विजय मिळवला तर एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. मात्र हा अपक्ष उमेदवार हा भाजपचा बंडखोर अन् शिवसेना शिंदे गाटाच्या वाटेवर असल्यानं तसं बघायला गेलं तर महायुतीने ११ पैकी ११ जागा खिशात घातल्या असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

नाशिकचा निकाल धक्कादायक 

भाजपच्या गिरीष महाजन यांनी नाशिक विधान परिषद निवणूक निकाल हा धक्कादायक असून आमच्या सर्व मतदारांनी आमच्या उमेदवाराला का पाठिंबा दिला नाही याची चौकशी केली जाईल असेही ते म्हणाले.

गोकुळ गिते शिंदेच्या शिवसेनेत? 

भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते हे शिवसेना शिंदे गटात दाखल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

सोलापुरातून भाजपचे राजेंद्र राऊत विजयी 

भाजपच्या राजेंद्र राऊत यांनी सोलापुरातून विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसंत देशमुख यांचा पराभव केला आहे. यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अमरावती विधानपरिषदेत प्रवीण पोटे यांचा दणदणीत विजय 

अमरावती विधानपरिषद निवडणुकीत प्रवीण पोटे यांनी दणदणीत विजय मिळवला असून काँग्रेसचे हर्षाजीत देशमुख यांचा पराभव झाला आहे.

धैर्यशील कदम विजयी 

धैर्यशील कदम हे विजयी झाले असून त्यांना 591 मतांची पहिली पसंती मिळाली असून अभयसिंह जगताप यांना पहिल्या पसंतीची २९५ मते मिळाली आहेत.

माझा विश्वास घात झाला

महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा नाशिक विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला असून त्यांनी पराभवानंतर महायुतीच्या नेत्यांनी आपला विश्वास घात केल्याचा आरोप करत यामागे गिरीष महाजन असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा पराभव 

काँग्रेस उमेदवार अतुल लोंढें यांचा पराभव झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे.

नाशिकमध्ये गोकुळ गितेंचा विजय 

नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते यांनी विजय मिळवला असून हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Vidhan Parishad Result 2026:

Vidhan Parishad Result 2026 Live: महाराष्ट्रातील ११ विधानपरिषद जागांचा आज निकाल लागले. यात ११ पैकी १० जागांवर महायुतीचे उमेदवार जिंकून आले आहेत तर एका जागी बंडखोर उमेदवार जिंकून आला आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या हाती भोपळा आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरमुळं विधानपरिषद निवडणुकीत रंगत आली होती. तसेच नाशिक आणि औरंगाबादमध्ये बंडखोरी झाल्यामुळं कोणाला किती जागा मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

या ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिंदे सेनेच्या नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी आपला अर्ज मागे घेतला नव्हता.

अखेर गोकुळ गिते यांनी आपले म्हणणे खरे करून दाखवत सर्व मतदार आमच्याबाजूनं असल्याचं सिद्ध करून दाखवलं. गोकुळ गितेंनी विजयाचा गुलाल लावला आहे. मात्र आता त्यानंतर नाशिकच्या राजकारणात उलटफेर होताना दिसत आहे.

विजयी गोकुळ गिते हे भाजपकडे न जाता आता शिवसेना शिंदे गटाकडे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ते आज एकनाथ शिंदे यांना भेटण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news