Lok Sabha Result : राज्याचा पहिला कल दुपारी 12 वाजता

प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने राज्यातील 48 मतदारसंघांसाठी मतमोजणी करण्याबाबतची तयारी पूर्ण झालेली आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत साधारण कल लक्षात येईल. रात्रीपर्यंत सर्व निकाल हाती येतील, असा दावा राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकांचे पाच टप्पे घेण्यात आले. या निवडणुकीची मतमोजणी 39 ठिकाणी करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी राज्यातील सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. यासाठी 39 ठिकाणी असलेल्या 48 मतमोजणी केंद्रांवर 20 हजार 725 कर्मचारी तैनात आहेत. एकूण 289 हॉलमध्ये 4309 मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. या मतमोजणी केंद्रांवर राज्यातील एक लाख 26 हजार 279 मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी करण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रांवर सुरुवातीला पोस्टाद्वारे आलेल्या मतदानाची मोजणी करण्यात येईल. राज्यातील सुमारे 2 लाख 56 हजार 898 इतक्या पोस्टल मतांची ही मोजणी होणार आहे. त्यानंतर 98 हजार 140 मतदान केंद्रांवरील 1 लाख 97 हजार 45 बॅलेट युनिट आणि 98 हजार 140 कंट्रोल युनिट तसेच 98 हजार 140 व्हीव्हीपॅट असलेल्या ईव्हीएम मशिनद्वारे मतमोजणी करण्यात येईल. मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक फेरीगणिक आकडेवारी जाहीर करण्यात येईल. मतमोजणीच्या साधारण 25 ते 28 फेर्‍या होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी असल्याने मतमोजणीच्या फेर्‍या कमी होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news