Maharashtra Cabinet Decision | महाराष्ट्रातील महिला क्रिकेट खेळांडूचा रोख पारितोषिक देऊन गौरव; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

क्रिकेट विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचे मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन
Indian Women Cricket Honor
भारतीय महिला संघाचे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. (Pudhari Photo)
Published on
Updated on

Indian Women Cricket Honor

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषकावर पहिल्यांदाच भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय संघाचे आज (दि.४) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अभिनंदन करण्यात आले. याबाबतच्या अभिनंदन प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय संघाच्या या घवघवीत यशाबाबत गौरवोद्गार काढले.

भारतीय संघातील महाराष्ट्राच्या खेळाडू स्मृती मानधाना, जेमिमा रॉड्रीग्ज, आणि राधा यादव यांना या ऐतिहासिक विजयातील भागीदारीसाठी रोख पारितोषिकाने गौरव करण्याचा निर्णय़ देखील मंत्रिमंडळ बैठकीत मंजुर करण्यात आला. त्याचबरोबर संपूर्ण टीमचा देखील सत्कार करण्यात येणार आहे.

Indian Women Cricket Honor
राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस संतप्त; तत्काळ दिले आदेश

दरम्यान, राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी "MAHA ARC LIMITED" बंद करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तर केंद्राच्या नॅशनल अँसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीची स्थापन केली होती. त्याच धर्तीवर राज्य कंपनीची स्थापना सप्टेंबर २०२२ मध्ये स्थापन करण्यात आली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२३ मध्ये या कंपनीला परवाना नाकारल्याने कायदेशीर दृष्ट्या या कंपनीला कामकाज पाहणे शक्य नसल्याने, कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news