Maharashtra voter list revision : १.२२ कोटी मतदारांना लवकरच नोटीस

नोंदीत विसंगती असलेल्यांना प्रथम संपर्क; व्हॉटस्ॲ‌पवरही उत्तर देण्याची संधी
Maharashtra voter list revision
Maharashtra voter list revisionpudhari photo
Published on
Updated on

पुणे / मुंबई : विशेष सघन मतदारयादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत महाराष्ट्रातील एक कोटी २२ लाख २४ हजार ७ मतदारांच्या नोंदी पडताळणीसाठी निश्चित करण्यात आल्या आहेत. या मतदारांना राज्य निवडणूक कार्यालयाकडून लवकरच नोटिसा बजावण्यात येणार आहेत.

नोटीस मिळाल्यानंतर संबंधित मतदारांना आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन सादर करण्याची तसेच काही प्रकरणांत व्हॉटस्ॲ‌पद्वारे प्रतिसाद देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Maharashtra voter list revision
PM Narendra Modi : सेमीकंडक्टर उत्पादनाचे भारत जागतिक केंद्र

या १.२२ कोटी मतदारांमध्ये ६२ लाख ४८ हजार २८१ मतदारांच्या नोंदींमध्ये नातेवाईकांच्या तपशिलाबाबत विसंगती आढळल्या आहेत, तर ५९ लाख ७५ हजार ७२६ मतदारांची नावे मागील मतदार यादीतील संबंधित नोंदींशी जुळवता आलेली नाहीत. मात्र, या मतदारांना अपात्र ठरवण्यात आलेले नसून, त्यांची नोंद पुढील पडताळणीसाठी चिन्हांकित करण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्राच्या विनंतीनुसार नोटिसा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये देण्यात येणार आहेत. न्यायव्यवस्था, लोकप्रतिनिधी तसेच पत्रकारिता, कला, संस्कृती, क्रीडा आणि सार्वजनिक सेवेशी संबंधित प्रमुख व्यक्तींच्या नोंदींमध्ये विसंगती असल्यास त्यांच्याशी संबंधित अधिकारी प्रथम थेट संपर्क साधतील.

इतर मतदारांना मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास व्हॉटस्‌ॲपसारख्या माध्यमातून प्राथमिक सूचना पाठवली जाऊ शकते. आवश्यक कागदपत्रे अपुरी असल्यास संबंधित मतदाराला निवडणूक अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहावे लागेल. कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी मतदारांना इपिक (इपीआयसी) क्रमांक किंवा नोटीस संदर्भ क्रमांकाचा वापर करता येणार आहे.

Maharashtra voter list revision
Grocery Prices: जीवनावश्यक किराणा मालाचे दर भडकले; गेल्या नऊ महिन्यांत तब्बल ३५ टक्क्यांनी महाग, मूगडाळ ९२ वरुन १३५ रुपयांवर

४ नोव्‍हेंबरला अंतिम यादी

नोटीस व त्यावरील कार्यवाहीची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news