Vidhan Parishad election | विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होणार

Vidhan Parishad election |
Vidhan Parishad election | विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी निवडणूक होणार
Published on
Updated on

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यामुळे रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार या सर्व जागांसाठी 18 जून रोजी मतदान, तर मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे.

यामध्ये महाराष्ट्र विधानपरिषदेचे 16 स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ, तर नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातील एका जागेचा समावेश आहे. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना या 16 मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूक होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news