प्रवाशांच्या खिशाला कात्री; 'लालपरी'चा प्रवास महागला

ST Bus Fare Hike| राज्य सरकारला १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव
ST Bus Fare Hike
प्रातिनिधिक छायाचित्र File Photo
Published on
Updated on

मुंबई :पुढारी वृत्तसेवा: संचित तोटा ९ हजारांवर आलेल्या एसटी महामंडळाने उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के तिकिटात वाढ (भाडेवाढ) करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता . या प्रस्तावावर , गुरुवार २३ जानेवारी रोजी मंत्रालयात राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले. भाडेवाढीवर शिक्कामोर्तब झाल्याने शनिवारी (दि. २५) पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे. भाडेवाढ झाल्यानंतर राज्यातील जनतेचा एसटीचा प्रवास ६० ते ८० रुपयांनी महागणार आहे. (ST Bus Fare Hike)

एसटी महामंडळ राज्यभरात दररोज सुमारे १ ४ हजार बसच्या माध्यमातून ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते.त्यातून महामंडळाला दिवसाला अंदाजे २३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु महामंडळाचे महिन्याला मिळणारे उत्पन्न आणि खर्च यांचे गणित काही बसत नाही.त्यामुळे महामंडळाला दिवसाला सुमारे तीन ते साडे तीन कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे महामंडळाने भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला. महामंडळाने राज्य सरकारला १४.१३ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिला होता. यापूर्वी २६ ऑक्टोबर २०२१ रोजी महामंडळाची १७.१७ टक्के भाडेवाढ झाली होती. (ST Bus Fare Hike)

राज्यातील प्रमुख मार्ग (अंदाजित तिकिट दर)

मार्ग सध्याचे तिकिट भाडेवाढीनंतर संभाव्य तिकिट दर

दादर-स्वागरेट (शिवनेरी).. ५३५रु ७००रु

मुंबई-आलिबाग -------------------- १६०रु १८०रु

मुंबई-दापोली--------------------- ३४०रु ३९०रु

मुंबई-विजयदुर्ग ------------ ७३०रु ---------- ८३०रु

मुंबई-कोल्हापूर ----------- ५६५रु ------------- ६३०रु

मुंबई- जळगांव -----------६३५रु ------------------- ७००रु

मुंबई- औरंगाबाद ------------८६०रु -------- ९७०रु

मुंबई-नाशिक ----------------४००रु ------------ ४५०रु

पुणे-औरंगाबाद---------------------३४०रु ----------------- ४००रु

पुणे-नाशिक------------------ ३१५रु --------- ३५५रु

पुणे-पंढरपूर ----------३१५रु ---------- ३५५रु

पुणे-अकोला ---------------- ७१५रु ---------------- ८१०रु

नाशिक-कोल्हापूर----------- ६७०रु ------------- ७३०रु

नाशिक-पंढरपूर -----------------५५०रु---------------- ६२० रु

औरंगाबाद- लातूर ------------- ४२०रु -------------- ४७०रु

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news