Maharashtra October Heat: महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या उन्हाचा चटका वाढणार; तापमान ३७ अंशांवर

जळगाव ३७.३, मालेगाव ३७.२ अंशांवर; परतीचा मान्सून कमकुवत राहण्याची शक्यता
October Heat
October Heat Pudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्याच्या कमाल तापमानाचा पारा ३७ अंशांवर गेला आहे. यात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारी जळगाव ३७.३, मालेगाव ३७.२ अंशांवर पोहोचले होते.

५ ते ६ ऑक्टोबरदरम्यान राज्यात परतीच्या मान्सूनचे आगमन झाले तर वातावरणात किंचित गारवा निर्माण होऊ शकतो. मात्र, परतीचा मान्सून कमकुवत असण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे वातावरणातील उकाडा दिवसेंदिवस वाढत जाण्याचे संकेत आहेत.

October Heat
CPWD Engineer Bribe Case: एनओसीसाठी तब्बल ७० लाखांची लाच! सीबीआयच्या सापळ्यात सीपीडब्ल्यूडी अभियंत्यासह पाच जण

शुक्रवारचे कमाल तापमान : मालेगाव ३७.२ (२०.८), जळगाव ३७.३ (१८.२), मुंबई ३३ (२७.५), अहिल्यानगर ३५.२ (२१.४), पुणे ३४.२ (२२.५), छत्रपती संभाजीनगर ३६.५ (२२.८), नाशिक ३४.८ (२२.५), कोल्हापूर ३२.७ (२३.६), सोलापूर ३६.८, रत्नागिरी ३४.६, सातारा ३५.२, सांगली ३२.४, परभणी ३५.१ (२१.५), अकोला ३६.५ (२३).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news