Maharashtra Monsoon Update : मुंबईसह कोकणात अतिवृष्टी, २४ तासांत सरासरी २१० मि. मी.; राज्यात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस

ठाणे, रायगड, पुणे- सातारा घाटमाथ्याला रेड अलर्ट
Maharashtra Monsoon Update : मुंबईसह कोकणात अतिवृष्टी, २४ तासांत सरासरी २१० मि. मी.; राज्यात सर्वदूर हलका ते मध्यम पाऊस
Published on
Updated on

पुणे : मुंबईसह कोकणात २४ तासांत २१० मिलीमिटर पाऊस झाला असून, तेथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाची नोंद झाली आहे. कोकणासह घाटमाथ्यावर बहुतांश भागात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

मुंबईसह कोकणात गत २४ तासांत दमदार पाऊस झाला आहे. मुंबई ८०, ठाणे २०६, रायगड २२२.७, रत्नागिरी १९५.९, सिंधुदुर्ग १६९.३, पालघर २२५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कोकणात चोवीस तासांत सरासरी २१० टक्के अधिक, तर संपूर्ण राज्यात १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस झाला आहे.

राज्यात गत २४ तासांत झालेला पाऊस (मि.मी.)

कोकण : माथेरान २०८, सांताक्रूझ २०५, डहाणू १९३, पनवेल १९१, राजापूर १७०, कर्जत १५२, श्रीवर्धन १३९, पालघर १२६, मंडणगड १२५, गुहागर, उल्हासनगर १२४, माणगाव १२३, खालापूर, पेण १२०, रत्नागिरी ११५, हरणई ११४, तलासरी, विक्रमगड ११०, भिवंडी १०९, वसई, दापोली १०८, लांजा १०७, उरण १०४, सुधागड पाली १०२, मुरबाड १०१, सांगे १००, महाड ९७, अंबरनाथ ९६, दोडामागव ९५, मुरुड, सावंतवाडी ९०, जव्हार, खेड, कल्याण ८७, कणकवली ८६, वाडा ८४, फोंडा ७१.

घाटमाथा : भिरा २३१, धारावी १६७, ताम्हिणी १३५, दावडी ११६, डोंगरवाडी ११४, शिरगाव १०७, कोयना १०३, खोपोली १०२, लोणावळा ९७, अंबोणे ९६, खंद ९५, लोणावळा ९५, भिवपुरी ९०, वळवण ८१, तनळशी ७३, पोफळी ६९.

मध्य महाराष्ट्र : लोणावळा १२२, महाबळेश्वर ८.३, गगनबावडा ६६, इगतपुरी ६०, वेळे ४२, ओझरखेडा राधानगरी ४०.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर ४३, खुलताबाद ४०, पाथरी २१, माहूर, मानवत १७, तोंडापूर वसमत १५, पूर्णा, वाशी, भोकर १२.

विदर्भ : कोपर्णा ११२, बल्लारपूर १०३, भद्रावती १०३, झरीजा मणी १०१, मारेगाव ९७, रामटेक ९.५, मौदा ९१, वणी ८९, रामटेक ८५, पारतशवनी ८४, आष्टी ७९, वर्धा ७७, भामरागड ७३, नागपूर विमानतळ ७१, चंद्रपूर ७०, वर्धा ६९, नरखेड ६५, आर्वी ६४, काटोल ६२, दारव्हा ६१, बाबुळगाव, अहेरी ५९, खरंगणा ५८, बुलढाणा ५७.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news