Longest kidney waitlist : महाराष्ट्रात किडनीसाठी सर्वाधिक वेटिंग

राज्यभर अवयवांच्या प्रतीक्षेत सुमारे 9423 रुग्ण
Longest kidney waitlist
महाराष्ट्रात किडनीसाठी सर्वाधिक वेटिंगpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : मुंबईसह राज्यात अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या दरवर्षी झपाट्याने वाढत आहे. राज्यात सध्या 9423 रुग्ण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये किडनीसाठी सर्वाधिक रुग्ण प्रतीक्षेत आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षा यादी असूनही अवयवदान करणार्‍यांच्या संख्येत वाढ झालेली नाही.

बदलती जीवनशैली, निसर्ग पर्यावरणातील बदल, आहारात चटपटीत, तेलकट, खाद्यपदार्थांचा समावेश, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होत आहेत. तरुण वयात अनेक अवयव निकामी होत असून अवयव प्रत्यारोपण आवश्यकता लागत आहे. अवयव प्रत्यारोपण हा एखाद्या अवयवाला झालेल्या रोगाच्या शेवटच्या टप्प्यावरील उपाय मानला जातो. पण अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदानाची कमतरता भासत आहे.

अवयवदानामध्ये हृदय, किडनी, यकृत, फुप्फुसे, स्वादुपिंड, आतडे आणि हात यांचा समावेश, तर ऊतकांमध्ये (टिशू) हाडे, टेंडन्स कॉर्निया, त्वचा, हृदयाच्या झडपा आणि शीरा यांचा समावेश होतो. सध्या किडनीच्या रुग्णांची प्रतीक्षा यादी सर्वाधिक आहे. राज्याच्या सार्वजनिक विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात 7271 रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत, तर 1883 जणांना यकृताची आवश्यकता आहे. त्यानंतर हृदय (122), फुप्फुस (38), स्वादुपिंडाचे (6) रुग्ण या प्रतीक्षायादीत आहेत.

एखाद्या मेंदूमृत (ब्रेनडेड) व्यक्तीचे अवयव गरजू आठ व्यक्तींचे प्राण वाचवू शकतात. मात्र समाजात पुरेशी जाणीव जागृती नसल्याने अवयव दानाचे प्रमाण अत्यल्प आहे. जगण्याची दुर्दम्य इच्छा आहे; पण प्रत्यारोपणासाठी आवश्यक अवयवच मिळत नसल्याने अनेक रुग्ण मृत्यूला कवटाळतात. अवयवाच्या प्रतीक्षेतील अनेक रुग्ण मृत्यूच्या दिशेने पुढे सरकत असतात. त्यामुळे अवयवदानाची चळवळ मोठ्या गतीने पुढे सरकणे आवश्यक आहे.

मृत व्यक्तीच्या अवयवाचे किती वेळात करू शकतो प्रत्यारोपण?

एखादी व्यक्ती मृत पावल्यानंतर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापूर्वी तीन प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्या झाल्यानंतर दात्यांकडून अवयव घेतल्यानंतर हृदय 4 तासांत, यकृत 9 तास, किडनी 20-24 तास, स्वादुपिंड 14-15 तासांत प्रत्यारोपण करावे लागते.

  • महाराष्ट्रात गेल्यावर्षी अवयव गरजूंच्या प्रतीक्षा यादीत 8 हजार 240 रुग्ण होते. यावर्षी ही संख्या 9 हजार 418 झाली आहे. दात्यांअभावी रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news