ITI Upgrade Project: राज्यातील 54 शासकीय आयटीआयचा दर्जा उंचावणार

दक्ष प्रकल्पाअंतर्गत निवड; अमरावती, पुणे, मुंबई, नागपूर येथील संस्थांचा समावेश
ITI Upgrade Project
ITI Upgrade ProjectPudhari
Published on
Updated on

मुंबई: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा उंचाविण्यासाठी दक्ष प्रकल्पाअंतर्गत राज्यातील 54 शासकीय ‌‘आयटीआय‌’ची आदर्श आयटीआय म्हणून निवड करण्यात आली आहे. डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्कील्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट दक्ष प्रकल्प हा सरकारने जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्याचा निर्णय घेतलेला महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.

आयटीआयमध्ये विविध व्यवसायांशी निगडित कौशल्यांचे प्रशिक्षण उमेदवारांना दिले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून उद्योग जगताच्या गरजा बदलल्या असून त्या गरजांच्या अनुषंगाने नवनवीन ट्रेड आयटीआयमध्ये शिकवले जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासापासून उपकरणे, प्रयोगशाळा आणि साहित्य यांचे नूतनीकरण व अद्यायवतीकरण केले जाणार आहे.

ITI Upgrade Project
MNS Agitation: हाफकिनच्या खासगीकरणाविरोधात मनसेचे संस्थेबाहेर जोरदार आंदोलन

‌‘हब अँड स्पोक्स क्लस्टर मॉडेल‌’अंतर्गत देशभरातील ‌‘आयटीआय‌’चा दर्जा उंचावण्यासाठी पीएम-सेतू ही योजनाही सुरू करण्यात आली आहे. तसेच, राज्यातील शासकीय ‌‘आयटीआय‌’च्या विकासासाठी आशियाई विकास बँकेकडून ‌‘महादृष्टी‌’ प्रकल्प भविष्यात प्रस्तावित आहे. या तिन्ही योजनांच्या माध्यमातून राज्यातील शासकीय ‌‘आयटीआय‌’चा दर्जा उंचाविण्यात येणार आहे.

विभाग, आयटीआयची आकडेवारी

अमरावती विभाग -अमरावती (2), अकोला (2), यवतमाळ (2), बुलढाणा (1), वाशिम (1) छ. संभाजीनगर विभाग -छ. संभाजीनगर (1), बीड (1), धाराशिव (1), हिंगोली (1), जालना (1), लातूर (1), नांदेड (1), परभणी (1) मुंबई विभाग- मुंबई शहर (2), सिंधुदुर्ग (2), रत्नागिरी (2), ठाणे (2), रायगड (1), पालघर (1) पुणे विभाग -पुणे (2), कोल्हापूर (2), सोलापूर (2), सातारा (1), सांगली (1) नाशिक विभाग - नाशिक (2), अहिल्यानगर (2), नंदूरबार (2), जळगाव (1), धुळे (1) नागपूर विभाग - भंडारा (2), वर्धा (2), चंद्रपूर (2), गोंदिया (2), नागपूर (1), गडचिरोली (1)

ITI Upgrade Project
Mumbai Pune Expressway Closed: प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे उद्या 3 तास बंद, पर्यायी मार्ग कोणते आहेत?

कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड

समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम करण्यासाठी नऊ शासकीय ‌‘आयटीआय‌’ची निवड करण्यात आली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील मोझरी, नांदेड जिल्ह्यातील किनवट, पुणे जिल्ह्यातील माणिकडोह, चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, मुंबई उपनगरमधील चेंबूर, पालघर जिल्ह्यातील मोखाडा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शासकीय आयटीआयचा समावेश असल्याचे सोमवारी विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

अमरावती विभाग -अमरावती (2), अकोला (2), यवतमाळ (2), बुलढाणा (1), वाशिम (1) छ. संभाजीनगर विभाग -छ. संभाजीनगर (1), बीड (1), धाराशिव (1), हिंगोली (1), जालना (1), लातूर (1), नांदेड (1), परभणी (1) मुंबई विभाग- मुंबई शहर (2), सिंधुदुर्ग (2), रत्नागिरी (2), ठाणे (2), रायगड (1), पालघर (1) पुणे विभाग -पुणे (2), कोल्हापूर (2), सोलापूर (2), सातारा (1), सांगली (1) नाशिक विभाग - नाशिक (2), अहिल्यानगर (2), नंदूरबार (2), जळगाव (1), धुळे (1) नागपूर विभाग - भंडारा (2), वर्धा (2), चंद्रपूर (2), गोंदिया (2), नागपूर (1), गडचिरोली (1)

कौशल्य प्रशिक्षणासाठी निवड

समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगारक्षम करण्यासाठी नऊ शासकीय ‌‘आयटीआय‌’ची निवड करण्यात आली आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील मोझरी, नांदेड जिल्ह्यातील किनवट, पुणे जिल्ह्यातील माणिकडोह, चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, मुंबई उपनगरमधील चेंबूर, पालघर जिल्ह्यातील मोखाडा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील शासकीय आयटीआयचा समावेश असल्याचे सोमवारी विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news