Medical College : राज्यातील आरोग्यसेवेचे होणार सशक्तीकरण

कोल्हापूर येथील नर्सिंग महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात येणार
Medical College
medical collegeप्रातिनिधीक छायाचित्र
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी जपानच्या इंटरनॅशनल को ऑपरेशन एजन्सीकडून (जायका) 3 हजार 708 कोटींचे वित्तीय सहाय्य घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याअंतर्गत कोल्हापूर, मिरज येथील नर्सिंग महाविद्यालयांचे बांधकाम करण्यात येणार आहे.

जनतेला किफायतशीर दरात वैद्यकीय सुविधा देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी मनुष्यबळ व त्यांना दर्जेदार वैद्यकीय शिक्षण उपलब्ध व्हावे याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात आली आहेत. जळगाव, लातूर, बारामती, सांगली, कोल्हापूर, नंदूरबार व गोंदिया या सात जिल्ह्यांमध्ये 100 प्रवेश क्षमतेचे शासकीय बीएस्सी नर्सिंग विद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांकरिता तसेच अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी, याकरिता स्ट्रेन्थनिंग टर्शरी हेल्थ केअर डिलिव्हरी, मेडिकल एज्युकेशन सिस्टीम अँड नर्सिंग सिस्टीम इन महाराष्ट्र हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी जपानच्या इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीकडून 3 हजार 708 कोटींचे वित्तीय सहाय्य उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news