C P Radhakrishnan, NSE
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नुकतेच एनएसई बुलच्या पुतळ्याचे अनावरण केले.(Photo- NSE)

NSE Bull चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते अनावरण

NSE मध्ये जगभरातून गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता- राज्यपाल
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क

महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नुकतेच एनएसई बुलच्या (NSE Bull) पुतळ्याचे अनावरण केले. तसेच यावेळी "द जर्नी ऑफ एम्पॉवरिंग १.४ बिलियन ड्रीम्स" या कॉफी टेबल बुकचेही प्रकाशन करण्यात आले. एनएसई मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमावेळी एनएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिषकुमार चौहान उपस्थित होते.

NSE बुलचा पुतळा मजबूत, सामर्थ्य, लवचिकता, गुणवत्ता दर्शवितो. हे घटक भारताच्या आर्थिक वाढीसाठी महत्त्वाचे आहेत. बुलचे मजबूत पाय आणि तो शक्तीशाली असणे हे देशाच्या मजबूत आर्थिक परिसंस्थेचे प्रतीक आहे. शाळकरी मुलगा, ग्रामीण महिला आणि व्यावसायिक अशा विविध पार्श्वभूमीतील भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती या पुतळ्याच्या सभोवताली आहेत. हा पुतळा भारताच्या गुंतवणुकीच्या लँडस्केपची सर्वसमावेशकता आणि एकता अधोरेखित करतो. तसेच यातून आर्थिक प्रगतीच्या एकसमान ध्येयासाठी एकत्रितपणे काम करण्याचा हेतू प्रतिबिंबित होतो.

NSE चे कॉफी टेबल बुक "The Journey of Empowering 1.4 billion Dreams" मध्ये एनएसईचा विकास आणि गेल्या ३० वर्षांतील भारताच्या आर्थिक वाढीच्या योगदानाचे प्रतिबिंब आहे. १९९४ मध्ये एनएसई सुरु झाल्यापासून गेल्या ३० वर्षांत, NSE ने भारताच्या भांडवली बाजारात क्रांती घडवली. भारताच्या वाढीसाठी प्रेरक आणि आरसा म्हणून एनएसईची महत्त्वाची भूमिका या पुस्तकात मांडली आहे.

NSE मध्ये जगभरातून गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता- राज्यपाल

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की “एनएसई बुलचे अनावरण आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करताना मला आनंद होत आहे. बुल आणि कॉफी टेबल बुकसाठी मी एनएसईचे अभिनंदन करतो. ज्यात भारतातील भांडवली बाजारांमध्ये बदल घडवून आणण्यात एनएसईच्या भूमिकेचे आणि देशाच्या प्रगतीतील योगदानाचे प्रतिबिंब आहे. NSE ही केवळ आर्थिक संस्था नाही; तर ती भारताच्या विकासाचे आणि आकांक्षांचे प्रतीक आहे. एनएसईने गुंतवणूकदारांचा मोठा विश्वास मिळवला आहे. ही केवळ वाढ नाही. ही एक क्रांती आहे. NSE मध्ये जगभरातून गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आहे. 'एनएसई'शिवाय विकसित भारत नाही.”

एनएसईचे एमडी आणि सीईओ आशिषकुमार चौहान म्हणाले की,"एनएसई बुलच्या पुतळ्याचे अनावरण आणि कॉफी टेबल बुकचे प्रकाशन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणे ही अभिमानाची गोष्ट आहे. आज, एनएसईकडे एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत सुमारे १० कोटी गुंतवणूकदार आहेत.''

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news