

Civil Servant Reshuffle 2025
मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी आठ सनदी अधिकार्यांच्या बदल्या केल्या. बदल्यांमध्ये नवी मुंबईचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे आयुक्त नितीन पाटील यांची मुंबईतील महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली केली आहे; तर कापूस महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असलेले अप्पासाहेब धुळाज यांच्यावर मंत्रालयातील ओबीसी बहुजन वेल्फेअर कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबईतील महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले लहू माळी यांची नवी मुंबईतील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या आयुक्तपदी,तर छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांची माळी यांच्या जागी बदली केली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगनाथम एम. यांच्याकडे बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे. बीडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवणे यांची छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली केली आहे.
त्याचबरोबर अमरावती येथील भातकुली-तिवसा उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी मिन्नू पी. एम. यांना गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आणि गडचिरोलीच्या देसाईगंज उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी मानसी यांना लातूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे.