Transgender Toilets: तृतीयपंथीयांसाठी राज्यातील सर्व महापालिकांमध्ये स्वतंत्र शौचालये; महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींची तरतूद

राज्यातील सर्व महानगरपालिका हद्दीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र आणि सुलभ शौचालये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सुविधेसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून महानगरपालिकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
Transgender Toilets
Transgender ToiletsPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या हद्दीत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये व्यवस्था उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सुविधेसाठी तब्बल १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सर्व महानगरपालिकांकडून शौचालय उभारणीसंदर्भातील प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली.

सध्या अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या वापराबाबत तृतीयपंथीयांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रात स्वतंत्र आणि सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Transgender Toilets
Vishakha Raut: विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द; ठाकरे गटाला मोठा धक्का

नवीन शौचालये उभारण्यासाठी स्वतंत्र जागेचा मोठ्या प्रमाणावर शोध घेण्याऐवजी, सध्या कार्यरत असलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या शेजारी अथवा लागूनच ही सुविधा उभारण्याचे नियोजन आहे. त्यामुळे उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून कामाला वेग देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Transgender Toilets
Bhiwandi Stray Dog Attack: कामतघर परिसरात एकाच दिवशी ३२ जणांना घेतला कुत्र्याने चावा

टप्प्याटप्प्याने उभारणार

राज्यातील सर्व महानगरपालिकांना तृतीयपंथीयांसाठी शौचालयांची आवश्यकता, उपलब्ध जागा आणि प्रस्तावित ठिकाणांची माहिती सादर करण्यास सांगण्यात आले आहे. प्राप्त प्रस्तावांच्या आधारे निधीचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. तृतीयपंथीय समुदायाला सार्वजनिक ठिकाणी सन्मानाने आणि सुरक्षितपणे मूलभूत सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे मिसाळ यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news