Maharashtra Government| अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबाला आता वर्षाला साडी मिळणार नाही!

राज्यातील कॅप्टिव्ह मार्केट योजना बंद करण्याचा महाराष्ट्र वस्त्रोद्योग विभागाचा निर्णय
Maharashtra Government| अंत्योदय रेशनकार्डधारक कुटुंबाला आता वर्षाला साडी मिळणार नाही!
Published on
Updated on

अंत्‍योदय रेशन कार्ड असणारया कुंटुंबाला यापूर्वी वर्षाला एक मोफत साडी मिळत होती. पण महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाने कॅप्टिव मार्केट योजनाच बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यापुढे अंत्‍याेदयचा लाभ घेणारयांना साडी मिळणार नाही. यापूर्वी या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबातील महिलांना वर्षातून एकदा सण-उत्सव किंवा होळीच्या काळात रेशन दुकानांमधून प्रत्येकी एक साडी मोफत दिली जात होती.

आज जाहीर झालेल्या शासन निर्णयातून वस्त्रोद्योग विभागाने ही कबूली दिली आहे. इतर प्रस्तावित योजनांचा भार असल्याने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे. यापुर्वी राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारकांना वर्षाला एक साडी मिळत होती.. प्रति वर्ष अंत्योदय कुटुंबाला यंत्र मागावर विणलेली साडी देण्यात येत होती.

शासनाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की सन २०२३ पासून ही योजना सुरु होती यामध्ये अंत्‍योदय रेशनकार्ड असलेल्या कुटुंबातील महिलेला वर्षातून एक साडी मोफत दिली जात होती. पण सध्या वस्त्रोद्योग महामंडळातर्फे सुरु असलेल्या इतर योजना, वस्त्रोद्योग घटकांना दिले जाणारे अर्थसहाय्य, व प्रस्तावित योजनांचा भार यामुळे यापूढे कॅप्टीव्ह मार्केट ही योजना बंद करावी लागत आहे. त्‍यामुळे शासनाकडून अत्‍योंदय रेशनकार्ड धारकांना दिली जाणारी एक मोफत साडी आता यापूढे दिली जाणार नाही, ही साडी यंत्रमागावर विणलेली असायची.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news