

Devendra Fadanvis Maharashtra Flood Rescue Operation :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेत पूर बाधित क्षेत्रात १७ NDRF आणि SDRF च्या तुकड्या तैनात केल्याचं सांगितलं. त्यांनी मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर बचाव कार्य सुरू केल्यांच सांगितलं. याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याचं देखील आश्वासन दिलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बचाव आणि मदत कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या जवळपास १७ तुकड्या विविध भागात तैनात करण्यात आल्या आहेत. आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई देखील जेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १० दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातील.'
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात यंदाच्या हंगामात विक्रमी ९७५ मिलीमीटर पाऊस पडला आहे. सरासरीपेक्षा १०२ टक्के पाऊस झाला आहे. ते म्हणाले, 'धाराशीव, अहिल्यानगर, जळगाव, सोलापूर, बीड आणि परभणी भागात गेल्या काही दिवसात तुफान पाऊस झाला आहे.'
फडणवीस यांनी सांगितलं की धाराशीव जिल्ह्यात हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे. यात एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. सरकारनं अनेक लोकांसाठी अन्न आणि तातपुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांसाठी आता २ हजार २१५ कोटी रूपये देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर अधिकचे १ हजार ८२९ देखील शेतकऱ्यांना वितरीत करण्यात येणार आहेत. याचा फायदा राज्यातील ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना होणार आहे.
याचबरोबर राज्याचे सर्व मंत्री हे हे आजपासून पूर बाधित क्षेत्राचे दौरे करणार आहेत असं देखील फडणवीस यांनी सांगितलं. मी देखील दौरे करणार आहे.