
मुंबई : दूध व दुग्धजन्य पार्थातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवत २,३४८ किलो दुग्धजन्य पदार्थ व पावडर आणि २०२ लिटर दूध जप्त केले. १९ व २० ऑगस्ट रोजी झालेल्या कारवाईत नवी मुंबईतील महापे परिसरातच १,३०२ किलो/लिटर दुग्धजन्य पदार्थांचा सुमारे १२ लाख २४ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, तर बीडच्या आष्टीमध्ये कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरूया जाणान्या संशयित १,८०० किलो व्हे पावडरचा २ लाख ६२ हजार ७०० रुपयांचा साठा जप्त करून संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकूण मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थासह अन्य अन्नपदार्थांता सुमारे २६ लाख ४१ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. राज्यातील ८९ हॉटेल, रेस्टॉरेट, थाये आणि अन्य अन आस्थापनांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी ७१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून, १३ अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
महापेत भास्कर डेअरीवर मोठी कारवाई
नवी मुंबईतील भास्कर डेअरी, एमआयडीसी, महापे येथे १९ ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील कलम २६ व २७च्या तरतुदीचे उल्लंघन झाल्याचा संशय असलेला दुग्धजन्य पदार्थांचा साठा आढळला.
एफडीएने ४७३ किलो स्किम्ड मिल्क पावडर (चंद्रकमल) जप्त केली. तिची किंमत १ लाख ६० हजार ८२० रुपये आहे. तसेच ७५ किलो मीडियम फॅट पनीर (गास्कर), किंमत १२ लाख ५०० रुपये, असा एकूण ५४८ किलो दशाजन्य पदाौता ११ लाख ८३ हजार ३२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.
पी. के. डेअरीतून ७६१ लिटर दूध ताब्यात
महापे येथीलच पी. के. डेअरीचीही तपासणी करण्यात आली. यावेळी ३९३ लिटर सैल म्हशीची दूध आणि ३६८ लिटर सैल गायीचे दूध, असा एकूण ७६१ लिटर दुधसाता जप्त करण्यात आला. या साठ्याची किंमत ४० हजार ५५८ रुपये आहे. संबंधित दूध मानकांनुसार आहे की नाही, याची पुढील तपासणी करण्यात येत आहे. विजय डेअरीचे १४१ लिटर दूध जप्त
नवी मुंबईतील विजय डेअरीवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीत १३८ लिटर सैल म्हशीचे आणि तीन लिटर गायीचे दूध, असे एकूण १४१ लिटर दूध आढळले. सुमारे १० हजार ९४४ रुपयांचा हा साठा अवमानक असल्याचा संशय असल्याने तो जप्त करण्यात आला. अन्न सुरक्षा कायद्यातील कलम २६ व २७नुसार पुढील कार्यवाही सुरू आहे.
बीडमध्ये कृत्रिम दूध निर्मितीचा संशय
बीड जिल्ह्यातील आष्टी परिसरात एफडीए आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून दूध मेसळीसाठी वापरल्या जाणान्या व्हे पावडरचा १,८०० किलो साठा जप्त केला. आष्टी-जामगाव रस्त्यावर पिकअप वाहनातून पावहस्ती वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला.
वाहनाची तपासणी केली असता २५ किलो वजनाच्या ४७ गोप्या आढळल्या चालकाच्या चौकशीत आणखी २५ गोण्या यापूर्वी आष्टी परिसरात उतरविल्याची माहिती मिळाली. दोन्ही ठिकाणचा साठा ताब्यात घेतल्यानंतर एकूण ७२ गोण्या म्हणजेच १,८०० किलो व्हे पावडर जप्त करण्यात आली.
या मालाची वाहतूक करणाऱ्यांकडे परवाना, खरेदी-विक्रीची बिले, वाहतूक चलन किंवा अन्य अधिकृत कागदपत्रे आढळली नाहीत, प्राथामिक तपासात ही पावडर दूध संकलन केंद्रे आणि डेअऱ्यांना पुरवून कृत्रिम दूथ तयार करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात अन सुख्क्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दूध भेसळीच्या या साखळीतील उत्पादक, पुरवठादार आणि खरेदीदारांचा शोध सुरू आहे.
गुटखा पानमसाल्यावरही कारवाई
दूध भेसळीबरोबरच प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदाथांविरोधातही राज्यभर कारवाई करण्यात आली. मुंबई, कोकण, पुणे आणि नागपूर विभागांत मिळून १२ एफआयआर दाखल करून १८ जणांना अटक करण्यात आली. प्रतिबंधित आपदार्थांचा मोठ्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून अनेक आस्थापना सील करण्यात आल्या.
अकोल्यात ३,४१६ किलो तेल जप्त
अकोल्यातील समीर एंटरप्रायझेस येथून लेबलिंग नियमांचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून ३.४१६.८ किलो रिफाइंड सोयाबीन तेल, किंमत ६ लाख १९ हजार ८०० रुपये, अपत करण्यात आले. 'सुपर सूर्य' आणि 'दिव्या' या बँडच्या तेलाचा हा साठा आहे.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेतून ही कारवाई सुरू असून, दूध मेराळ, प्रतिबंधित पदार्थांची विक्री आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे.