

Maharashtra farmer loan waiver 2 lakh ‘पुण्यश्लाक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. कर्जमाफी आता लांबणार असल्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी व नेत्यांनी याेग्य कर्जमाफी व्हावी यासाठी आंदोलन पुकारले होते.
यापुर्वी ५० हजारांची मर्यादा आणि कर्ज परतफेडीच्या जाचक अटी पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. आता नवीन घोषणेनुसार कर्जमाफीसाठी नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची रक्कम २ लाखांच्या आत असेल तर पात्र शेतकऱ्ंयांचे कर्ज माफ होणार आहे.
आता या घोषणेनुसार आता थकबाकीदार आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाईल. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पूर्वी ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ मिळण्याची तरतूद होती, ती आता २ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच २०२६-२७ च्या पीक कर्जाची अटही रद्द केली आहे.
कर्जमाफीसाठी अनेक जाचक अटी होत्या त्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी मोठा मोर्चा काढला होता. तसेच आमदार रोहीत पवार यांनीही पंढरपूर येथे कर्जमाफीसाठी आंदोलन केले होते. या योजनेचा फायदा राज्यातील सुमारे ५६ ते ५८ लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कर्जमाफी पुन्हा लांबणार ?
आज झालेल्या घोषणेमुळे सध्या प्रस्तावित कर्जमाफीच्या याद्या अपलोड सुरु होत्या आता परत नियम बदल्यामुळे कर्जमाफीचा थेट लाभ होण्यास विलंब होणार आहे. या नव्या निकषामुळे परत आता पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यांच्या याद्या, कागदपत्रे यामध्ये वेळ जाणार असल्याामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीस विलंब होण्याची शक्यता आहे.