CM Devendra Fadnavis | उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्राची ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ ओळख : मुख्यमंत्री

डेन्मार्कच्या राजदूतांची सदिच्छा भेट
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavisfile photo
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र देशाचे ग्रोथ इंजिन असून, परदेशी गुंतवणूकदारांसाठी सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. सरकारच्या उद्योगस्नेही धोरणांमुळे जगभरातील कंपन्यांसाठी महाराष्ट्र ‘ग्लोबल इन्व्हेस्टमेंट हब’ म्हणून उदयास येत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

भारतातील डेन्मार्कचे राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांनी फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी उपस्थित होते. या सदिच्छा भेटीदरम्यानच्या बैठकीत महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संधी, बंदर विकास, शिपिंग, ऊर्जा आणि पाणी व्यवस्थापन या विषयावर चर्चा करण्यात आली. या प्रसंगी राजदूत रास्मुस अबिलगार्ड क्रिस्टेन्सेन यांच्यासह फर्स्ट सेक्रेटरी मॅथियास एमिल बेंग्टसन तसेच मानद डेन्मार्क वाणिज्य दूतावास, मुंबईचे उप महावाणिज्यदूत कन्नन नटराजन उपस्थित होते.

फडणवीस यांनी यावेळी वाढवण बंदराची माहिती दिली. या बंदरामुळे महाराष्ट्र आणि देशाला जागतिक स्तरावर सागरी महासत्ता बनण्याची संधी मिळेल. तसेच लॉजिस्टिक्स आणि निर्यातवाढीस मोठे बळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जल वाहतुकीला चालना

राज्यात जल वाहतुकीला चालना देण्यासाठी महत्त्वाकांक्षी वॉटर टॅक्सी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी संपूर्ण प्रणाली विकसित करून प्रभावी नियंत्रण व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे. इलेक्ट्रिक फेरी आणि इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी तंत्रज्ञानासाठी डेन्मार्कच्या आघाडीच्या कंपन्यांशी भागीदारी करण्यास राज्य शासन इच्छुक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

डेन्मार्कने छोट्या अंतराच्या फेरी सेवांमध्ये इलेक्ट्रिक तंत्रज्ञान यशस्वीपणे वापरले असून त्याचा मुंबई-कोकण किनारपट्टीसाठी उपयोग होऊ शकतो, असे डेन्मार्कचे राजदूत क्रिस्टेन्सेन यांनी सांगितले. भारत-डेन्मार्क ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अंतर्गत विशेषतः सागरी क्षेत्रात महाराष्ट्र राज्य महत्त्वाचा भागीदार ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news