

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर आणखी एक वर्षासाठी २५० रुपये इतकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सेतूवर चारचाकीच्या एकेरी प्रवासासाठी २५० रुपये पथकर भरावा लागतो. मुंबई ते नवी मुंबईला जोडणारा २२ किलोमीटर लांबीचा देशातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. या पुलामुळे दक्षिण मुंबई ते नवी मुंबई हे अंतर सहज पार करता येते. १८ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या सागरी पुलाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले. हा MTHL पूल मुंबईतील शिवडीपासून सुरू होतो. आणि रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवा येथे संपतो. या पुलामुळे मुंबई ते नवी मुंबई हे २ तासाचे अंतर अवघ्या २० मिनिटात पूर्ण करता येते.