Raj Thackeray : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; ठाकरे गटाची मते वळविण्याची रणनिती

Chandrashekhar Bawankule,  Raj Thackeray
Chandrashekhar Bawankule, Raj Thackeray

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray )यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यातील महायुतीला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ठाण्यात सभाही घेतली. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची मुंबईत आज (दि.१५) भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाची मते महायुतीच्या बाजूने कशी मिळवता येईल, याबाबत चर्चा या दोघांमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.

बावनकुळे- राज ठाकरे भेटीत काय ठरलं

  • चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरे यांची मुंबईत आज (दि.१५) भेट घेतली.
  • शिवसेना ठाकरे गटाची मते महायुतीच्या बाजूने कशी मिळवता येईल,
  • शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मराठी मते विभागली
  • ठाकरे गटाकडे असलेली मराठी मते महायुतीकडे वळविण्यासाठी मनसेचा मोठा फायदा

महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरे यांनी ठाण्यात आणि कोकणात सभा घेतल्या आहेत. १७ मेरोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबईत शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. या सभेचे निमंत्रण राज ठाकरे यांनी देण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर मोदी आणि राज ठाकरे येत असल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Raj Thackeray : मराठी मते महायुतीच्या पारड्यात पडण्यासाठी दोघांमध्ये चर्चा

मुंबईत लोकसभेच्या सहा जागांसाठी शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. शिवसेनेपाठोपाठ मनसेकडेही मराठा व्होट बँक आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मराठी मते विभागली आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडे असलेली मराठी मते महायुतीकडे वळविण्यासाठी मनसेचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या मतांसाठी प्रभावी प्रचार यंत्रणा राबविणे, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, यासाठी रणनिती आखली जात आहे. याचीच चर्चा बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये झाल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news