Maharashtra Bandh call : दिल्लीतील लाठीमाराविरोधात २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक, 'वंचित' आक्रमक

Maharashtra Bandh call : , सुजात आंबेडकरांचे सर्वपक्षीय, नागरिकांना बंदमध्‍ये सहभागी होण्याचे आवाहन
Delhi Police student lathi charge protest
Delhi Police student lathi charge protestPudhari
Published on
Updated on

Delhi Police student lathi charge protest : दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद आता राज्‍यात उमटू लागले आहेत. पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी 'वंचित बहुजन आघाडी'ने येत्या गुरुवार, २३ जुलै रोजी 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे. याबाबतची पोस्‍ट सुजात आंबेडकर यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म फेसबुकवर केली आहे. तसेच सर्व समविचारी पक्ष आणि नागरिकांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

सरकारचा हुकूमशाही चेहरा पुन्‍हा एकदा उघड

सुजात आंबेडकरांनी आपल्‍या पोस्‍ट म्‍हटलं आहे की, न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अश्रूधुर, पाण्याचे फवारे आणि खिळे ठोकलेल्या लाठ्यांचा (piked-batons) वापर करण्यात आला. यावरून या सरकारचा हुकूमशाही आणि फॅसिस्ट चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे.

Delhi Police student lathi charge protest
Sonam Wangchuk hunger strike : "... तर उपोषण मागे घेईन" ; सोनम वांगचुक यांचे केंद्र सरकारला पत्र

संपूर्ण राज्यभर 'महाराष्ट्र बंद'ची हाक

या हिंसक पोलीस कारवाईचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे २३ जुलै रोजी संपूर्ण राज्यभर 'महाराष्ट्र बंद' पुकारण्यात आल्‍याचेही त्‍यांनी पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

Delhi Police student lathi charge protest
CJP Protest Delhi: CJP संसद मोर्चाप्रकरणी मोठी कारवाई! 10 FIR दाखल; दिल्लीत सुरक्षा वाढली, बंगालमधून 2 हजार CRPF जवान रवाना

सर्व समविचारींनी एकत्र यावे

"महाराष्‍ट्र बंदची हाक वंचित बहुजन आघाडीने दिली असली, तरी हा बंद यशस्वी करण्यासाठी मी सर्व समविचारी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, विद्यार्थी संघटना, नागरिक, विद्यार्थी आणि पालकांना एकत्र येण्याचे आवाहन करतो. ही लढाई केवळ उत्तरदायित्व मागण्यापुरती मर्यादित नसून, आपल्या देशाचे भविष्य वाचवण्यासाठीची लढाई आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news