

राज्यातील 29 महापालिकेत 150 दिवसांच्या ई सुधारणा कार्यक्रम अंतर्गत तर पाचव्या क्रमांकावर अमरावती महापालिका आयुक्तांनी कार्यालय मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पहीला क्रमांकावर ठसा उमटवला आहे.
सर्वोत्तम महापालिका आयुक्त म्हणून पनवेल आयुक्त मंगेश चितळे यांनीपहीला क्रमांक पटकावला आहे. तर दुसर्या क्रमांकावर पुणे आयुक्त, तिसऱ्या क्रमांकावर उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि चौथ्या क्रमांकावर नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे तर पाचव्या क्रमांकावर अमरावती महापालिका आयुक्तांनी कार्यालय मूल्यमापनात नंबर पटकावला आहे.
कार्यालयीन मूल्यमापन: १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली महाराष्ट्रातील शासकीय कार्यालये
1. सर्वोत्तम जिल्हाधिकारी (३६ पैकी) क्रमांक (Rank) कार्यालयाचे नाव
१ जिल्हाधिकारी, जळगाव १८८.००
२ जिल्हाधिकारी, ठाणे १८६.७५
३ जिल्हाधिकारी, धाराशिव १८५.२५
४ जिल्हाधिकारी, लातूर १७९.२५
५ जिल्हाधिकारी, कोल्हापूर १७७.००
2. सर्वोत्तम पोलीस अधीक्षक (३४ पैकी) क्रमांक कार्यालयाचे नाव
१ पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) १६८.२५
२ पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण) १६१.००
३ पोलीस अधीक्षक, अकोला १४८.७५
४ पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) १४५.००
५ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी १४४.२५
3. सर्वोत्तम विभागीय आयुक्त (६ पैकी)क्रमांक सामान्यीकृत गुण ( 200)
१ विभागीय आयुक्त, नागपूर १५९.५२
२ विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर १५२.३८
4. सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (३४ पैकी) या श्रेणीतील निकाल ८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येतील.
5. सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त (२९ पैकी) सामान्यीकृत गुण 200)
१ महानगरपालिका आयुक्त, पनवेल १८७.७५
२ महानगरपालिका आयुक्त, पुणे १८६.२५
३ महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर १८४.२५
४ महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई १८१.७५
५ महानगरपालिका आयुक्त, अमरावती १७९.५०
6. सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक /उपमहानिरीक्षक (८ पैकी)
१ परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, नांदेड १२१.२३
२ परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, नागपूर १२०.८८