Mahadev Online Betting Scam : 'महादेव बेटिंग अॅप'चा किंगपिन जाळ्यात !

दुबईहून परतताच अभिषेक कुमारला हैदराबाद विमानतळावर अटक; सीबीआयची कारवाई
Mahadev Online Betting Scam
Mahadev Online Betting Scampudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मोठी कारवाई करत किंगपिनपैकी एक असलेल्या अभिषेक कुमारला अटक केली आहे. दुबईहून भारतात परतल्यानंतर हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

अभिषेक कुमार महादेव बुकच्या माध्यमातून सुरू असलेल्या ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराच्या कारभारात सक्रियपणे सहभागी होता. बेटिंग पॅनलचे समन्वय, पैशांची वसुली आणि बेटिंगमधून मिळालेल्या कथित पैशातून दुबईत स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात त्याची भूमिका असल्याचा तपास यंत्रणेचा आरोप आहे. अटकेनंतर त्याची झडती घेतली असता तपासासाठी महत्त्वाचे ठरणारे कथित आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.

Mahadev Online Betting Scam
Ajit Pawar Ganeshotsav Banner: '...परत पाठवा आमच्या दादाला!', बाप्पाच्या विसर्जनावेळी अजितदादांसाठी भावनिक साद, बॅनरने मन हेलावलं

या साहित्यावरून अभिषेक कुमारचा महादेव बेटिंग अॅपच्या कारभारात सक्रिय सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, तसेच तो मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर आणि शुभम सोनी यांच्या संपर्कात काम करत होता, असे सीबीआयने म्हटले आहे. अभिषेक कुमारला अटकेनंतर हैदराबादमधील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने त्याला तीन दिवसांचा ट्रान्झिट रिमांड मंजूर केला. त्यानंतर त्याला रायपूर येथे नेऊन न्यायालयात हजर करण्यात आले असून, तेथे त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

१३ एफआयआरचा तपास सीबीआयकडे

  • छत्तीसगड सरकारने महादेव बेटिंग अॅपशी संबंधित विविध पोलीस ठाण्यांतील १३ एफआयआरचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत १०० आरोपींविरुद्ध आठ आरोपपत्रे दाखल केली आहेत.

  • यात अॅपचे कथित मुख्य प्रवर्तक, बेटिंग पॅनल ऑपरेटर, हवाला ऑपरेटर तसेच काही सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, महादेव अॅपचे प्रमुख प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल अद्याप फरार आहेत.

  • त्यांना भारतात आणण्यासाठी सीबीआयकडून प्रयत्न सुरू असून आतापर्यंत सात रेड कॉर्नर नोटिसा आणि दोन प्रत्यार्पण प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत.

Mahadev Online Betting Scam
Rashi Bhavishya Today: 'या' राशीच्या लोकांची आज मनातील इच्छा पूर्ण होणार; तुमच्या राशीत काय आहे खास?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news