Maha-Smiles Campaign : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकाराने 11 जिल्ह्यांत महा-स्माईल्स मोहीम

31 जुलैला नागपुरातून सुरुवात; विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत
Mumbai
31 जुलै रोजी नागपुरातून महा-स्माईल्स मोहिमेला सुरुवात होणार आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून बालकांच्या चेहर्‍यावरील दुभंगलेले ओठ आणि फाटलेल्या टाळू या जन्मजात विकारांवरील उपचारासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. 31 जुलै रोजी नागपुरातून या मोहिमेला सुरुवात होणार आहे.

स्माईल ट्रेन इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्व यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आता ही मोहीम पूर्णपणे मोफत राबविली जाणार आहे. ‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ या पहिल्यावहिल्या उपक्रमाअंतर्गत पुढील 90 दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांत फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहेत. यामध्ये लवकर निदान, उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या बालकांवर नागपूर, गोंदिया, अकोला, वर्धा येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

Mumbai
Devendra Fadnavis | जनतेच्या मनातले निवडणुकीत दिसले, पुन्हा दिसेलच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दरम्यान, स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या 11 जिल्ह्यांतील मुलांमध्ये जन्मजात दुभंगलेले ओठ आणि टाळू विकार दूर होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. क्लेफ्ट विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते. यासाठी उपचारच नव्हे, तर जागरूकता ही देखील गरजेची आहे. त्यामुळे ‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे. या मोहिमेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील बाधितांना सहाय्य होणार आहे.

Mumbai
Mumbai housing scheme | मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर, मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्लेफ्ट विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात. जवळपास 700 मुलांमागे एकात हा विकार आढळून येतो. शस्त्रक्रिया करूनच हा विकार दूर करता येतो. मात्र, या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही. म्हणूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी क्लेफ्ट वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावे, यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news