Extortion Case | लोढा कंपनीकडे ६ कोटींच्या खंडणीची मागणी

मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक : ४१ लाख रुपये घेतल्याचा आरोप
Extortion Case
Extortion CasePudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई : गोव्यातील ‘वन गोवा’ प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यासाठी तब्बल सहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सिद्धेश जाना तारी आणि प्रितेश साळगावकर या दोघांना मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने दोडामार्ग येथून अटक केली. या दोघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना ३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयितांनी कंपनीकडून आतापर्यंत ४१ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

गोवा येथील ‘वन गोवा’ हा प्रकल्प ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा लिमिटेड’ कंपनीकडून विकसित केला जात आहे. कंपनीचे कार्यालय लोअर परळ परिसरात असून, याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात कंपनीचे अधिकारी श्रेयस पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. सिद्धेश व प्रितेश यांनी कंपनीकडे ६ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. प्रकल्पाचे काम सुरू राहावे आणि वाद टळावा, यासाठी कंपनीने आरोपींना काही रक्कम दिल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे. त्यानुसार सिद्धेश याला ३४ लाख, तर प्रितेश साळगावकर याला ७ लाख रुपये, अशी ४१ लाख रुपयांची रक्कम दिल्याचे पोलिसांना सांगण्यात आले.

पैसे दिल्यानंतरही मागणी सुरूच

४१ लाख रुपये दिल्यानंतरही १२ ऑगस्ट रोजी प्रितेश साळगावकर याने कंपनीच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधून पुन्हा पैशांची मागणी केली. अन्यथा काम बंद पाडू, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news