Devendra Fadnavis |महाराष्ट्र विकसित करुन दाखवू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : पंतप्रधान मोदी यांनी ज्याप्रमाणे विकसीत भारत हा संकल्प केला मांडली आहे. तोच संकल्प घेऊन आम्ही महाराष्ट्र विकसीत करुन दाखवू, त्यासाठीच आम्ही सत्तेत आहोत असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज वरळी डोम येथे आयोजित भाजप प्रदेशाध्यक्ष निवड कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. भाजप नेते केंद्रीय मंत्री किरण रिजीजू व कंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमूख उपस्थितीत आमदार रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
पुढे ते म्हणाले की भाजपाचे आतापर्यंत जे प्रदेश अध्यक्ष झालेत ते सर्व सामान्य घरातले आहेत. हे केवळ भाजपामध्येच घडू शकते. आज आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की रवींद्र चव्हाण आज भाजपचे प्रदेश अध्यक्ष झालेत. निवड करताना केवळ कार्य बघीतले जाते. कुणीही रक्ताच्या नात्याचा नाही किंवा वारसदार आहे म्हणून निवड केली जात नाही असे त्यानी स्पष्ट केले. त्यामूळे या पक्षातून आलेला चहा विकणारा देखील पंतप्रधान होऊ शकतो असे त्यांनी भाजपाची कार्यपद्धती असल्याचे सांगितले.
रवींद्र चव्हाण, बावनकुळे यांचे कौतूक
पुढे त्यांनी रवींद्र चव्हाण यांचे कौतूक करताना म्हटले की रवींद्र चव्हाण यांच्यात जिद्द आहे आणि चिकाटी आहेत ते धाडसी. आहेत. आज मला आनंद आहे की कोकणी माणूस प्रदेशाध्यक्ष झालाय. त्यांचे अभिंनंदन त्याचबरोबर माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही फडणवीस यांनी कौतूक केले. बावनकुळे यांनी पायाला भिंगरी लावून पक्ष वाढवला. बावनकुळे जास्त रागवतात पण ते प्रमाणे रागवतात हे नंतर कार्यकर्त्यांना कळलं. पक्षामध्ये पाठपुरावा तुम्ही केला म्हणून दीड. कोटी. सदस्य संख्या झाली. अशा शब्दात त्यांनी बावनकुळे यांच्या कामाची पोचपावती दिली.
मराठीच्या मुद्यावरुन विरोधकांचा समाचार
आपल्यास भाषणात विरोधकांचा समाचार घेताना ते म्हणाले मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचे काम तुम्ही केलेत. तुम्ही मराठीच्या माणसाला हद्दपार केलेत, मराठी माणसाला घर आम्ही दिले, निवडणुका आल्यात की यांना मराठी माणूस आठवतो याची यांना लाज कशी वाटतं नाही असा हल्ला बोल त्यांनी केला. पुढे ते म्हणाले पहिली पासून 12 वी पर्यत हिंदी अनिवार्य उद्धव ठाकरेंच्या काळात झाले. या राज्यात सक्ती फक्त मराठीची आहे. आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे, पण आम्ही आम्ही इंग्रजीला पाय घड्या घालत नाही, कुणाची युती झाली पाहिजे कुणाची होऊ नये या राजकारणात आम्ही पडत नाही याकडे लक्ष न देता आम्ही राज्याला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणलं असे ठामपणे त्यांनी सांगितले.

