नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर लॅम्बोर्गिनीचा वेगवान थरार!

Navi Mumbai airport : नवी मुंबई विमानतळावर अनोखी चाचणी
Navi Mumbai airport
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एका वेगवान मोटारीने थरारक चाचणी घेतली.
Published on
Updated on

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर नुकतीच एका वेगवान मोटारीने थरारक चाचणी घेतली असून ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. जगप्रसिद्ध ब्रिटीश मोटार मासिक अॅटोकारने ही चाचणी आयोजित केली होती आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर नुकतेच याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे.

या चाचणीसाठी जगप्रसिद्ध लॅम्बोर्गिनी मोटारीची निवड करण्यात आली होती. काही सेकंदांत शून्य ते ३०० किमी प्रतितास असा तिचा वेग पाहून अनेकांचे डोळे विस्फारले. ही चाचणी अधिकृत परवानगी घेतल्यानंतरच पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे विमानतळाच्या धावपट्टीवरील काम अत्यंत प्रगत टप्प्यावर पोहोचल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याआधीही या धावपट्टीवर एक विमान यशस्वीरीत्या उड्डाण घेऊन गेल्याचे समोर आले होते. आता तर लॅम्बोर्गिनीसारख्या स्पोर्ट्स कारच्या वेगाचीही याठिकाणी कसोटी घेण्यात आली आहे. अॅटोकार मासिकाने यापुर्वी चंदीगड विमानतळावर अशाच प्रकारची चाचणी घेतली होती. मात्र, नवी मुंबई विमानतळासारख्या मोठ्या प्रकल्पावर अशा वेगवान मोटारीची चाचणी होणे, ही एक वेगळीच बाब ठरते.

दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी काही दिवसांपूर्वी विमानतळ प्रकल्पाची पाहणी केली होती. त्यांनी जाहीर केले होते की, जून २०२५ पर्यंत हे विमानतळ कार्यान्वित होण्यास सज्ज होईल. त्यामुळेच अशा चाचण्या सध्या विमानतळाच्या अखेरच्या टप्प्यातील कामांच्या पार्श्वभूमीवर होत असल्याचे मानले जात आहे. नवी मुंबईतील स्थानिक नागरिक आणि उद्योगजगत या नव्या विमानतळाच्या प्रत्यक्ष सुरूवातीच्या प्रतीक्षेत आहे. अशा घडामोडीमुळे या प्रकल्पाची उत्सुकता अधिकच वाढली आहे. लवकरच या भव्य विमानतळावरून प्रवासी विमानं उड्डाण घेतानाही दिसतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news