

मुंबई : राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत तब्बल 26 लाख 34 हजार बोगस लाभार्थी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्ह्यातच सर्वाधिक जवळपास अडीच लाख अपात्र लाभार्थी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मोठ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने आता सर्व पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसीद्वारे फेरपडताळणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारच्या शोधमोहिमेत ही बाब उघडकीस आली आहे. यानंतर जून महिन्यापासून या 26 लाखांहून अधिक महिलांचा सन्मान निधी रोखण्यात आला आहे.
बोगस लाभार्थींची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता, त्यांनी थेट उत्तर न देता, योजना बंद करू का, अशी प्रतिक्रिया दिली.
एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणे.
आयकर भरणार्या महिलांनी योजनेचा लाभ घेणे.
शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेताना माहिती लपवणे.