

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाकडून 344 कोटी 40 लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. यामुळे लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात मिळण्यास सुरुवात झाली आहे. महायुती सरकारने जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
आतापर्यंत लाडक्या बहिणींना 13 हप्त्यांचे पैसे मिळाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 344 कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 9 सप्टेंबरला जारी करण्यात आला आहे.
महायुती सरकारने जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. मागील विधानसभा निवडणुकांत महायुती सरकारसाठी हीच योजना किंगमेकर ठरली आणि महायुती पुन्हा सत्तेत आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या शासन निर्णयामुसाक लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 14 हप्त्यांची रक्कम पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.