

पुढारी ऑनलाईन डेस्क : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा खार येथील स्टुडिओ शिंदेंच्या शिवसैनिकांनी रविवारी रात्री फोडला. याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शनिवारी मुंबईतील 'हॅबिटॅट' स्टँडअप कॉमेडी शोमध्ये कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. ही टीका समाजमाध्यमावर पसरल्याने शिंदेंचे शिवसैनिक आक्रमक झाले. राहुल कनाल आणि कुणाली सरमळकर यांनी पदाधिकार्यांसोबत जात कुणालच्या स्टुडिओमध्ये तोडफोड केली होती.