अखेर जावेद अख्तर आणि कंगना रणौत यांच्यात समझोता; फोटो पोस्‍ट करत दिली माहिती

५ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर झाला समेट
kangana ranaut javed akhtar case
अखेर जावेद अख्तर आणि कंगना रणौत यांच्यात समझोता; फोटो पोस्‍ट करत दिली माहितीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

जावेद अख्तर आणि कंगना रणौत यांनी एकमेकांविरूध्द दाखल केलेली अवमान याचिका मागे घेण्याबाबत दोघेही तयार झाले. मुंबई महानगर अतिरिक्त मुख्य न्यायाधीश आशिष आवारी यांनी पुढाकार घेत दोघांमध्ये समेट घडवून आणला. न्यायाधीश अतुल जाधव यांच्या स्वाक्षरीने समेटाबाबत न्यायालयीन आदेश जारी झाला. त्‍यामुळे गेल्‍या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये सुरू असलेला न्यायालयीन लढा अखेर संपुष्‍टात आला. कंगना रानावत यांनी या विषयी पोस्‍ट करून दिली माहिती.

अनेक वर्षांपासून कोर्टात सुरू असलेल्‍या केसमध्ये जोवद अख्तर यांना मोठा विजय मिळाला आहे. जावेद अख्तर यांना झालेल्‍या असुविधेसाठी कंगना रणौत यांनी माफी मागितली आहे. ५ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर कंगणा रणौत आणि जावेद अख्तर यांनी आपापसातील सहमतीने हा खटला संपवला आहे. कंगणा यांच्या माफीनाम्‍यामुळे अख्तर आणि कंगना रणौत यांच्यात समेट झाला आहे. कंगना राणौतने कराराच्या लेखी अटींमध्ये म्हटले आहे की, त्‍यांना जावेद अख्तर यांच्या बद्दल खूप आदर आहे. माझ्या विधानांमुळे जावेद अख्तर यांना झालेल्या गैरसोयीबद्दल मी माफी मागते. मी भविष्यात असे कोणतेही विधान करणार नाही. मी माझी सर्व विधाने मागे घेते. कंगणा यांनी या विषयीची माहिती सोशल मीडियावर पोस्‍ट करून दिली आहे.

कंगना रणौत आणि जावेद अख्तर

अनेक वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेल्‍या खटल्‍यामध्ये जावेद अख्तर यांचा अखेर विजय झाला आहे. जावेद अख्तर यांना झालेल्‍या गैरसोयींबद्दल कंगणा यांनी त्‍यांची माफी मागितली आहे. कंगणा राणौत यांनी कराराच्या लेखी अटींमध्ये म्हटले आहे की, त्‍यांना जावेद अख्तर यांच्या बद्दल खूप आदर आहे. माझ्या विधानांमुळे जावेद अख्तर यांना झालेल्या गैरसोयीबद्दल मी माफी मागते. मी भविष्यात असे कोणतेही विधान करणार नाही. मी माझी सर्व विधाने मागे घेते.

काय होते प्रकरण

जावेद अख्तर यांनी कंगना राणौत यांच्या विरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. कंगना यांनीही प्रति याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी गेल्या ५ वर्षांपासून सुरू होती. गेल्या ४० सुनावणींमध्ये कंगना राणौत न्यायालयात उपस्थित नव्हत्‍या, तर जावेद अख्तर नियमितपणे सुनावणीदरम्यान न्यायालयात उपस्थित होते. या आठवड्यात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, कंगना या पुन्हा एकदा न्यायालयात हजर राहिल्‍या नाहीत, त्यानंतर जावेद अख्तर यांच्या वकिलाने कंगना यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली. या अपीलानंतर न्यायालयाने कंगना यांना न्यायालयात हजर राहण्याची शेवटची संधी दिली.

कंगना यांनी केली पोस्‍ट

समेट झाल्यानंतर, कंगना आणि जावेद अख्तर यांनी खूप चांगल्या वातावरणात चर्चा केली. दोघांनी भविष्यात एकत्र चित्रपटात काम करण्याबाबतही चर्चा केली. याशिवाय कंगना राणौत यांनीही एक पोस्ट शेअर केली आणि म्हणाल्‍या, 'आज जावेद जी आणि मी मध्यस्थीद्वारे आमचा कायदेशीर खटला संपवला आहे. मध्यस्थी दरम्यान जावेद जी खूप दयाळू होते. माझ्या पुढच्या दिग्दर्शनाच्या चित्रपटासाठी त्यांनी एक गाणे लिहिण्यासही सहमती दर्शवली आहे. या पोस्टशिवाय कंगना रणौत यांनी एक फोटोही शेअर केला आहे. यामध्ये त्‍यांनी जावेद अख्तर यांच्या शेजारी उभे राहून हसताना दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news