

कल्याण : अव्वाच्या सव्वा भाडे घेण्याच्या तक्रारी प्रवाशांकडून वाढत गेल्या व प्रवाशांच्या मीटर प्रमाणे भाडे आकारण्याच्या मागणीच्या पाठपुराव्या नुसार कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मंगळवारपासून मीटर प्रणे भाडे आकारणी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झाली.
कल्याण मध्ये मीटर प्रमाणे भाडे पद्धत नसून फक्त शेअर रिक्षा ही पद्धत सर्वत्र सुरू होती. शेअर रिक्षा ज्या ठिकाणी जायच्या त्या व्यतिरिक्त एखाद्या ठिकाणी प्रवाशास जायचे असल्यास रिक्षावाल्यांकडून त्यांच्या मनाप्रमाणे भाडे आकारले जात होते. यावर मार्ग म्हणून आज पासून कल्याण स्टेशन येथून मीटर प्रमाणे भाडे आकारण्याची सुरुवात झाली असून एक रांग मीटरची सुरू केली आहे व या प्रवासांना शेअरने जायचे आहे त्यांच्यासाठी पूर्वीप्रमाणेच रांगेचे नियोजन आहे.
कल्याणमध्ये आरपीआय, भाजप प्रणित तसेच इतर तीन ते चार रिक्षा चालक-मालक संघटना कार्यरत असून आम्ही मीटर पद्धतीसाठी सकारात्मक आहोत. असे सर्व संघटनांकडून सांगण्यात आले. स्टेशनवरून मीटर प्रमाणे प्रवासी जाणार परंतु तेथून येताना मात्र स्टेशनकडे शेअर रिक्षाने येणार त्यामुळे रिक्षावाल्यांचे आर्थिक नुकसान यामध्ये होणार आहे, अशी नाराजी देखील त्यांनी बोलून दाखवली.