

मुंबई : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या ज्योती मल्होत्राने मुंबईतील लालबागच्या राजाच्या गर्दीचे व्हिडीओ 2023 मध्ये काढल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. ज्योती मल्होत्रा किमान चार वेळा मुंबईत आली होती आणि इथे तिने शहरातील विविध आणि संवेदनशील भागांचे व्हिडीओ शूट केल्याचे उघडकीस आले आहे.
ज्योतीने मुंबईत भेट देण्यासाठी रेल्वे आणि लक्झरी बसने प्रवास केला. 2023 नंतर ती ऑगस्ट 2024 मध्ये अहमदाबाद-मुंबई अशा प्रवासातून कर्णावती एक्स्प्रेसच्या माध्यमातून मुंबईला पोहोचली होती. या प्रवासादरम्यान तिने अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले आहेत.
पुढे ज्योती सप्टेंबर 2024 मध्ये मुंबईत आली. दिल्लीहून पंजाब मेलने प्रवास करत मुंबई गाठली. आश्चर्याची बाब म्हणजे तिच्या एका व्हिडीओमध्ये पंजाब मेल कधीएकेकाळी पेशावरपर्यंत जोडली गेली होती असा उल्लेखही केल्याचे आढळते.