मृत्यूपूर्वी अनिल मेहतांचा मुलगी मलायकाला अखेरचा कॉल, काय म्हणाले होते?

Malaika Arora Father Death | अनिल यांचे दोन्ही मुलींवर होते प्रचंड प्रेम
Malaika Arora Father Death
अनिल कुलदीप मेहता यांचे कुटुंब.(Image source- X)
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा

सिनेअभिनेत्री मलायका अरोरा हिचे सावत्र वडील (Malaika Arora Father Death) अनिल कुलदीप मेहता (वय ६२) (Anil Kuldip Mehta) यांनी बुधवारी सकाळी राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्याच्या टेरेसवरुन उडी घेऊन जीवन संपवले. त्यांनी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नसल्याने त्यांनी जीवन संपविल्याच्या कारणांचा खुलासा होऊ शकलेला नाही. अनिल मेहता हे काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

अनिल मेहता म्हणाले, "मी आजारी असून थकलो आहे"

अनिल मेहता यांनी जीवन संपवण्याच्या काही क्षण आधी, त्यांच्या मुली अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांना अखेरचा फोन केला होता. "मी आजारी असून थकलो आहे," असे त्यांनी फोनवर सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, काही तासांनंतर मलायकाने इंस्टाग्रामवर जारी केलेल्या निवेदनात, वडिलांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाला खूप दुःख झाल्याचे म्हटले.

गेल्या काही दिवसांपासून अनिल मेहता हे गुडघ्याच्या आजाराने त्रस्त होते. गेल्या वर्षी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आराम मिळत नव्हता, त्यातच आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबाबत ते मानसिक तणावात होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांना कॉल केला आणि आपण आयुष्याला कंटाळून गेलो असल्याचे सांगितले होते. मलायकाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कॉल कट केला व काही वेळानंतर हा प्रकार घडला. अनिल यांचा कॉल आला तेव्हा मलायका पुण्यात होती.

मलायकाच्या वडिलांनी टेरेसवरून उडी मारुन जीवन संपविले

वडिलांच्या मृत्यूचे वृत्त समजताच मलायका अरोरासह तिची बहीण अमृता अरोरा, अभिनेता अरबाज खान आणि इतर बॉलीवूड कलाकारांनी मेहता यांच्या धाव घेतली. अनिल मेहता हे वांद्रे येथील आयेशा मनोर इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील टेरेस फ्लॅटमध्ये राहत होते. ते मर्चट नेव्हीमधून निवृत्त झाले होते. मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर अनिल मेहता यांनी तिच्या आईशी लग्न केले होते. त्यांचे मलायका आणि अमृता (Amrita Arora) या दोन्ही सावत्र मुलींवर प्रचंड प्रेम होते. अनेकदा ते त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करत. या दोघींनाही अनिल मेहता हे त्यांचे सावत्र वडील आहेत असे कधीच वाटले नाही. अनिल यांना सकाळी वृत्तपत्र वाचण्याची आवड होती. बुधवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाचत होते. त्यांची पत्नी त्यांच्यासोबत होती. सकाळी दहा ते साडेदहा वाजता ते टेरेसजवळ आले. काही वेळानंतर त्यांची पत्नी तिथे गेली असता त्यांना फक्त त्यांची चप्पल दिसली, तिने खाली पाहिले असता अनिल हे सोसायटीच्या आवारात पडलेले दिसले. याच दरम्यान मोठा आवाज आल्याने सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने तिकडे धाव घेतली. अनिल मेहता तिथे पडल्याचे पाहन त्याने सोसायटीच्या इतर रहिवाशांना कळवले. (malaika arora father news)

Malaika Arora Father Death
मलायका अरोराच्या वडिलांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवले (Video)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news