JJ Hospital Super Speciality: जे. जे. सुपरस्पेशालिटी रुग्णालय रखडले; कोट्यवधींची अत्याधुनिक उपकरणे धूळखात

गेल्या तीन वर्षांपासून वापराविना पडून असल्याने हजारो रुग्ण आधुनिक उपचारांपासून वंचित राहात आहेत.
JJ Hospital
JJ Hospital Pudhari
Published on
Updated on

मुंबई: मुंबईतील रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेले सर जे. जे. रुग्णालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी, या रुग्णालयासाठी मागविण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे गेल्या तीन वर्षांपासून वापराविना पडून असल्याने हजारो रुग्ण आधुनिक उपचारांपासून वंचित राहात आहेत.

या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१९ मध्ये झाले होते. जुलै २०२० मध्ये बांधकामासाठी कार्यादेश देण्यात आला होता. कंत्राटदाराने २६ महिन्यांत, म्हणजे २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे मान्य केले होते. मात्र मुदत उलटूनही रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. विलंबाबद्दल कंत्राटदारावर ३ कोटी रुपयांहून अधिक दंडही ठोठावण्यात आला आहे.

JJ Hospital
RTO Bribery Case: लाच मागणार्‍या दोन आरटीओ एजंटना अटक

दरम्यान, २०२३ मध्ये रुग्णालय सुरू होईल या अपेक्षेने कार्डियाक सर्जरी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी, पीडियाट्रिक सर्जरी, एन्डोक्राइनोलॉजी आणि प्लास्टिक सर्जरीसारख्या विभागांसाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणे मागविण्यात आली होती. मात्र इमारत तयार नसल्याने ही उपकरणे गोदामात धूळ खात पडून आहेत.

खर्चात दुपटीहून अधिक वाढ

रुग्णालयाच्या रखडलेल्या कामाचा फटका आर्थिकदृष्ट्याही बसला आहे. २०२० मध्ये ४०७.१६ कोटी रुपये असलेला प्रकल्प खर्च आता ७७८.७५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या मुद्द्यावर विधिमंडळात अनेकदा चर्चा झाली असून सरकारकडून वारंवार नव्या मुदती जाहीर करण्यात आल्या. मात्र एकही मुदत पाळली गेली नाही.

JJ Hospital
Borivali Petrol Pump Incident: पेट्रोलपंपावर सिगारेट पिण्यास विरोध केल्याने कारने फरफटत नेले; बोरिवलीतील घटना

उपकरणांच्या कार्यक्षमतेबाबतही चिंता

वैद्यकीय उपकरणांना उत्पादक कंपन्यांकडून ठरावीक वापर कालावधी दिलेला असतो. दीर्घकाळ विनावापर पडून राहिल्यास त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे भविष्यात या उपकरणांच्या देखभाल, दुरुस्ती किंवा पुनर्प्रमाणीकरणासाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो.

दरम्यान, याच कंत्राटदाराने गुजरातमध्ये अवघ्या वर्षभरात रुग्णालय उभारल्याचा दावा केला जात असून, मुंबईतील प्रकल्पाला तीन वर्षांहून अधिक विलंब का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रखडलेल्या या प्रकल्पामुळे राज्यातील सर्वात मोठ्या शासकीय वैद्यकीय संस्थांपैकी एक असलेल्या जे. जे. रुग्णालयातील रुग्णांना अद्ययावत उपचारांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news