High Court : बनावट तक्रार दाखल करणार्‍याला जे.जे.मध्ये लादी पुसण्याची शिक्षा

‘तुम से तुम तक’ या शोवरुन झी टीव्हीविरुद्ध बनावट तक्रार दाखल करणार्‍याला उच्च न्यायालयाने चांगलाच हिसका दिला
Fake complaint punishment JJ Hospital
Bombay High Courtfile photo
Published on
Updated on

मुंबई : ‘तुम से तुम तक’ या शोवरुन झी टीव्हीविरुद्ध बनावट तक्रार दाखल करणार्‍याला उच्च न्यायालयाने चांगलाच हिसका दिला . तक्रारदाराच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत न्यायालयाने तक्रारदाराला सरकारी जेजे रुग्णालयात स्वच्छता व लादी पुसण्याचे काम करण्याचे आदेश दिले.

झी टीव्हीवरील ‘तुम से तुम तक’ या नवीन शोवर विविध आरोप करीत महेंद्र संजय शर्मा यांनी तक्रार दाखल केली होती. त्याआधारे पोलिसांनी दाखल केलेली तक्रार रद्द करण्याची मागणी करीत झी टीव्हीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर न्या. रवींद्र घुगे आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सुनावणी झाली.

शर्माने सुरुवातीला सायबर सेलकडे आपले नाव सुनील शर्मा असे नोंदवले होते. मात्र गेल्या महिन्यात जेव्हा त्याला न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, तेव्हा त्याने आपले नाव सुनील महेंद्र शर्मा असल्याचे सांगितले. त्याच्या आधारकार्ड, पॅन कार्ड इतर कागदपत्रांमध्ये त्याचे नाव महेंद्र संजय शर्मा असे दिसून आले आहे. तक्रारदाराने तक्रार दाखल करत असताना काही प्रकारची कारवाई होण्याची भीती असल्याने तक्रारीत नाव बदलले आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.

तक्रारदाराची तोतयागिरी गंभीर चिंतेची बाब

संबंधित तक्रार केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरणार्‍या बातम्या आणि मतांवर आधारित होती. खोट्या ओळखीखाली अशी फालतू तक्रार दाखल करण्यासाठी तक्रारदाराने दिलेल्या स्पष्टीकरणावर आम्ही समाधानी नाही. हे कृत्य दुर्भावनापूर्ण हेतूने किंवा कदाचित एखाद्या प्रतिस्पर्ध्याच्या इशार्‍यावर केले गेले आहे असे दिसते. तक्रारदाराची तोतयागिरी गंभीर चिंतेची बाब आहे. ती न्याय प्रशासनात जाणूनबुजून अडथळा आणणारी आहे, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news