Andheri bank locker theft : अंधेरीतील नामांकित बँक लॉकरमधून दागिन्यांची चोरी

घटना अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आली होती ; ग्राहकाला बँकेकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने गुन्हा नोंद
Andheri bank locker theft
अंधेरीतील नामांकित बँक लॉकरमधून दागिन्यांची चोरीFile Photo
Published on
Updated on

मुंबई : अंधेरीतील एका नामांकित बँकेच्या लॉकरमधून एका व्यावसायिकाचे सुमारे 36 लाखांच्या सोन्याचे दागिन्यांसह इतर मुद्देमाल चोरीस गेल्याची घटना अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आली होती. मात्र ग्राहकाला बँकेकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आता डी. एन. नगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

तक्रारीत चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत 36 लाख रुपये असली तरी आजची किंमत सुमारे ऐंशी लाख रुपये असल्याचे बोलले जाते. यातील तक्रारदार अंधेरीतील रहिवाशी असून त्यांचा स्वत:चा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. पूर्वी ते जुहूच्या गुलमोहर रोड परिसरात राहत होते. यावेळी त्यांनी जुहू-वर्सोवा रोडवर असलेल्या एका नामांकित बँकेत खाते उघडले होते. ते बँकेचे जुने ग्राहक असल्याने त्यांना बँकेच्या वतीने एक लॉकर सुविधा मोफत देण्यात आली होती.

Andheri bank locker theft
Foul smell issue Thane : स्मार्ट ठाण्याची दुर्गंधीने घुसमट

याच लॉकरमध्ये त्यांनी घरातील विविध सोन्याचे, हिऱ्यांचे, चांदीचे दागिने, सोन्याचे नाणी, बिस्कीटसह इतर महत्त्वाचे दस्तावेज सुरक्षित ठेवले होते. 4 सप्टेंबर 2023 रोजी ते बँकेत लॉकर उघडण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांना लॉकरमधील विविध सोन्याचे दागिने, नाणी, बिस्कीट आणि रत्नजडीत सोन्याचे पेडंट असा सुमारे 36 लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.

Andheri bank locker theft
Raigad dry fish : किनारी सुक्या म्हावऱ्याचा सुटलाय घमघमाट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news