Jayant Patil : आम्ही जे बोललो, त्यावर 'कॅग'चे शिक्कामोर्तब : जयंत पाटील

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारने जनतेला फसवले
Jayant Patil News
कॅगच्या अहवालावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : कॅगचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

Jayant Patil News
चार महिने थांबा, मग मीच नमस्कार करतो : जयंत पाटील

Summary

  • कॅगच्या अहवालात राज्य सरकारवर ताशेरे

  • अर्थसंकल्प वास्तवापासून दूर, महालेखा परीक्षकांचे निरीक्षण

  • ‘अर्थसंकल्प वास्तववादी असावा’ अशी सूचना केली

राज्य सरकारकडून बेदरकार पद्धतीने उधळपट्टी

ते पुढे म्हणाले की, माझ्या अर्थसंकल्पीय चर्चेतील भाषणात मी राज्यात मालमत्ता निर्मिती (Asset creation) होत नसल्याबद्दल राज्याचे लक्ष वेधले होते. नेमकी तीच बाब देशातील सर्वोच्च घटनात्मक यंत्रणा असलेल्या ‘कॅग’ च्या अहवालात मांडली गेली आहे. या भाषणात मी असेही नमूद केले होते की, राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असून हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर आहे, अगदी तेच निरीक्षण महालेखा परीक्षकांनी नोंदवले असून ‘अर्थसंकल्प वास्तववादी असावा’ अशी सूचना केली आहे, असे त्यांनी सांगितले.

Jayant Patil News
प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे कोंबड्या पाळण्याएवढे सोपे नाही; जयंत पाटील समर्थकाचा रोहित पवारांवर निशाणा

कॅगने शिंदे -फडणवीस- पवार सरकारला सुनावले

आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे. राज्य सरकार वाटत असलेली अनावश्यक अनुदाने कमी करावीत, मालमत्ता निर्मितीकडे लक्ष पुरवावे, वाढीव पुरवणी मागण्या सादर करताना त्याचे समर्थन करता यावे. आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यात खर्च करण्याची पध्दत थांबवावी, अशा कडक शब्दांत कॅगने शिंदे -फडणवीस- पवार सरकारला सुनावले आहे, असेही त्यांनी सांगितले.

पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल...

पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण वाडवडिलांनी कष्टाने कमावलेले सर्व फुकून टाकून फक्त आजच्या दिवशी कशी मौजमजा करता येईल, असाच सध्याच्या राज्यकर्त्यांचा राज्य चालवतानाचा दृष्टिकोन आहे, अशी जोरदार टीका त्यांनी सरकारवर केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news