

मुंबई : कुर्ला येथील अंबिका नगरची पाणी समस्या कायम असल्याने भीम आर्मीच्यावतीने शुक्रवारी पालिका एल विभाग कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी आर्या कांबळे या विद्यार्थीने सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांना कळशी भेट देत, साहेब, पाण्याची वाट पहाट घरी थांबयचे की शाळेत जायचे असा प्रश्न केला.
कमी दाबाने पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांवर पाण्यासाठी घरी बसण्याची वेळ येत आहे. अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे गाऱ्हाणे यावेळी आंदोलकांनी मांडले.
भीम आर्मीचे अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गेल्या आठवड्यात वंचीत बहूजन आघाडीतर्फे एल वॉर्डातील सहाय्यक आयुक्ताना पाटी - पेन्सिल भेट देवून निषेध आंदोलन केले होते.