ITI admissions : आयटीआयला आतापर्यंत 91 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश

खासगी आयटीआयच्या जागा निम्म्याहून अधिक शिल्लक
ITI admissions
आयटीआयला आतापर्यंत 91 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत 1 लाख 50 हजार 28 जागांपैकी तब्बल 90 हजार 998 जागावर विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. शासकीय आयटीआयमधील बहुतांश जागा भरल्या असून खासगी आयटीआयच्या जागा निम्याहून अधिक शिल्लक आहेत.

शासकीय आयटीआयमध्ये 96 हजार 736 जागा होत्या या पैकी 69 हजार 693 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले तर खासगी आयटीआयमध्ये 53 हजार 292 इतक्या जागापैकी 21 हजार 305 मिळून 1 लाख 50 हजार 28 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी 90 हजार 998 विद्यार्थ्यानी प्रवेश घेतले आहेत.

8 जुलैपासून प्रवेशाला प्रारंभ झाल्यानंतर आतापर्यंत चार फेर्‍या आणि एक विशेष फेरी अशा पाच फेरी झाल्या असून या सर्व फेरीत 88 हजार 848 विद्यार्थ्यांनी कॅप अंतर्गत प्रवेश घेतले आहेत. त्याशिवाय संस्थास्तरावर 1 हजार 730 आणि अल्पसंख्याक कोट्यातून 1 हजार 240 असे मिळून सुमारे 2 हजार 150 प्रवेशासह मंगळवारी सायंकाळपर्यंत 90 हजार 998 इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामध्ये 76 हजार 49 मुले तर 14 हजार 949 मुलींचा समावेश आहे.

विभागनिहाय प्रवेश पाहता पुणे विभागात सर्वाधिक 17 हजार 937 प्रवेश झाले असून नाशिक विभागात 16 हजार 887, नागपूरमध्ये 15 हजार 119 , छत्रपती संभाजीनगर विभागात 14 हजार 118 , अमरावतीमध्ये 13 हजार 820 आणि मुंबई विभागात 13 हजार 220 असे प्रवेश झाले आहेत.

यंदाच्या प्रवेशात सर्वाधिक पसंती इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, संगणक ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट मेकॅनिक डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेईकल आणि वायरमन या प्रमुख ट्रेडला असून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी दाखल झाले आहेत. इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये सर्वाधिक 10 हजार 284 प्रवेश, तर फिटर मध्ये 9 हजार 185 प्रवेश झाले आहेत. वेल्डरमध्ये 6 हजार 21, सीओपीएमध्ये 5 हजार 188, मेकॅनिक डिझेलमध्ये 4 हजार 903, मेकॅनिक मोटर व्हेईकलमध्ये 4 हजार 869 आणि वायरमनमध्ये 4 हजार 370 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news