

मुंबई : कुर्ला येथील एका व्यवसायिकाला शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून साडेतेरा लाखांची फसवणूक करणार्या मोहम्मद जावेद अन्सारी, रेहान कौशर मेहफुज अलम, मोहम्मद अरफत बाबू शेख आणि आसिफ शरीफ खान या चौघांना सायबर पोलिसांनी मशिदबंदर येथील खासगी कार्यालयात छापा टाकून अटक केली.
या सायबर ठगांनी आशाप्रकारे अनेकांची फसवणूक केली असून मुंबईसह गुजरात व तेलंगणातील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी विविध बँकांमध्ये उघडण्यात आलेल्या बँक खात्यांचे तेरा किट, दोन लॅपटॉप, सहा मोबाईल, आठ सिमकार्ड, क्रेडिट, डेबीट कार्ड तसेच बोगस खाती उघडण्यासाठी लागणारे दस्तावेज आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
चौकशीत मोहम्मद जावेद याने बोगस कागदपत्रांवरुन विविध बँकेत खाती उघडली होती. याच खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती.