

IndiGo Employees Salary Hike IndiGo Management
मुंबई : देशातील २६ हजार इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रश्न अखेर भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मध्यस्तीनंतर सुटला आहे. इंडिगोच्या कमिटीच्या बैठकीत पगारवाढीसंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. या बैठकीत पगारवाढी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
त्याचबरोबर इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात देखील लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी वर्षातून दोनदा पगारवाढीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुंबई, गोव्यातील इंडिगोचे कर्मचारी भाजपमध्ये आल्यानंतर विशेष प्रयत्न करत पगारवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.