Market boom | सेन्सेक्सची भरारी; गुंतवणूकदार 17 लाख कोटींनी मालामाल

तीन हजार अंकांची ऐतिहासिक उसळी
Market boom |
Market boom | सेन्सेक्सची भरारी; गुंतवणूकदार 17 लाख कोटींनी मालामाल
Published on
Updated on

मुंबई : भारतीय शेअर बाजाराने बुधवारी इतिहासातील सर्वात मोठ्या उसळींची नोंद केली आहे. भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत दिलासादायक ठरलेल्या अमेरिका-इराण युद्धविरामामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल तीन हजार अंकांनी वधारला. या ऐतिहासिक तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अवघ्या काही तासांत 17 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे. सोबतच, जगभरातील शेअर बाजारही उसळले आणि कच्च्या तेलाचे भाव 14 टक्क्यांनी घसरून 95 डॉलर्स प्रतिबॅरलवर आले आहेत.

बुधवारी पहाटे अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या सीजफायरची (युद्धविराम) घोषणा करण्यात आली. या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली. तेल आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही बातमी संजीवनी ठरली आणि बाजार उघडताच खरेदीचा धडाका सुरू झाला.

ऐतिहासिक कामगिरी : 77,605चा टप्पा गाठला

आजच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 77,605 या उच्चांकी स्तराला स्पर्श केला. तब्बल 2,918 अंकांच्या या वाढीमुळे भारतीय बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरातील ही दुसरी मोठी झेप आहे. यापूर्वी 12 मे 2025 रोजी भारत-पाक तणाव निवळल्यामुळे बाजार सुमारे तीन हजार अंकांनी वधारला होता.

रुपया वधारला

कच्च्या तेलाचा वाढलेला भाव, युद्धामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेने विदेशी संस्थांनी काढून घेतलेली गुंतवणूक, यामुळे 30 मार्च रोजी एका डॉलरचा भाव 95.23 रुपयांपर्यंत वधारला होता. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 41 पैशांनी वधारला. त्यामुळे डॉलर 92.58 रुपयांवर आला आहे.

जगातील शेअर बाजारांनी केले स्वागत

युद्धविरामाचे जगभरातील शेअर बाजारांनी स्वागत केले आहे. कोरियाचा कोस्पी आणि जपानच्या निक्केई निर्देशांकाने 6 टक्क्यांनी उसळी घेतली. युरोपातील सीएसी, डॅक्स आणि एफटीएसई निर्देशांकाने 4 टक्क्यांनी वाढ नोंदवली. डाऊ जोन्स फ्यूचर तीन टक्क्यांनी वधारला. युरो स्टॉक्स फ्यूचर 5.4 टक्के, नॅसडॅक फ्यूचर्स 3.3 आणि एस अँड पी-500 फ्यूचर निर्देशांकात 2.7 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

कच्चे तेल दर पडल्याने दिलासा

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्ध 28 फेब्रुवारी रोजी सुरू झाल्यापासून कच्च्या तेलाचे सरासरी दर 100 डॉलर्सहून अधिक राहिले आहेत. युद्धविरामाच्या घोषणेनंतर कच्च्या तेलाचे भाव 14 टक्क्यांनी घसरून 95 डॉलर्स प्रतिबॅरलवर आले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहतूक सुरू होणार असल्याचे सकारात्मक पडसाद बाजारात उमटले.

युद्धविरामाचे गुंतवणूकदारांकडून स्वागत

अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या ऊर्जा संकटानंतर आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेनंतर गुंतवणूकदारांनी या युद्धविरामाचे स्वागत केले. परिणामी, तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली; ब्रेंट क्रूड दर सुमारे 15 टक्क्यांनी घसरून प्रतिबॅरल सुमारे 95 डॉलर्सवर आला, तर जागतिक शेअर बाजारात तेजी दिसून आली.

इतिहासातील मोठ्या हालचालींवर एक नजर

आजची वाढ अंकांच्या बाबतीत मोठी असली, तरी, टक्केवारीच्या हिशेबात जुना विक्रम मोडू शकलेली नाही. मात्र, अंकांच्या स्वरूपात हा आजवरचा दुसरा मोठा गेमचेंजर ठरला आहे.

12 मे 2025 : भारत-पाक तणाव निवळल्याने बाजारात सुमारे 3,000 अंकांची विक्रमी वाढ झाली होती.

8 एप्रिल 2026 : अमेरिका-इराण युद्धविराम आणि तेलाच्या किमतीतील घसरणीमुळे 2,918 अंकांची वाढ झाली.

4 जून 2024 : लोकसभा निवडणूक निकालांच्या दिवशी (इंट्राडे) 4,389 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली होती.

23 मार्च 2020 : कोरोना लॉकडाऊनच्या भीतीमुळे 3,934 अंकांची मोठी पडझड झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news